गोपीनाथ मुंडे जयंती
लोहा : लोहा तालुक्यातील सुभाषनगर येथे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला विठ्ठलराव गिते, डॉ. दीपा गिते, अभिजित गिते, ईश्वर गिते, गजानन मुंडे, नारायण कागणे, केशवराव खाडे आदी उपस्थित होते.
खड्डे आणि धुळीचे साम्राज्य
लोहा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ हा लोहा शहरातून जातो. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याशिवाय धुळीचे साम्राज्यही निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. आता मात्र धुळीने शहर माखले आहे. याकडे शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत.
इंधन दरवाढीचा निषेध
बिलोली : केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने बिलोली येथे निषेध करण्यात आला. दरवाढ मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याशिवाय केंद्रीय मंत्री दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
भय्यासाहेब आंबेडकर जयंती
हदगाव : चैत्यभूमीचे शिल्पकार भय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती पंचशील बुद्ध विहार येथे साजरी करण्यात आली. बौद्ध महासभेचे अध्यक्ष सोनबाराव गिरबिडे, एन.एम. गायकवाड, मनोज कदम, अमोल कदम, कैलास वाढवे, माधव वाढवे, डी.के. दवणे, भीमराव कांबळे, विलास भालेराव, गणेश गिरबिडे आदी उपस्थित होते.