नांदेड - देगलूर तालुक्यातील खानापूर रस्त्यावरील एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर ३१ डिसेंबर रोजी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी ३ हजार ७५० रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणात पोलीस नाईक सुरेश कंधारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पेनूर येथे मटका अड्ड्यावर धाड
नांदेड - लोहा तालुक्यातील पेनूर येथे एका पान शॉपजवळ सुरु असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. याठिकाणी टाईम बी नावाचा मटका सुरु होता. यावेळी पोलिसांनी १ हजार ७५० रुपये जप्त केले. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कुरुडे यांच्या ‘लॉकडाऊन’चे प्रकाशन
नांदेड - श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे यांच्या लॉकडाऊन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माधवराव पेटकर, सूर्यकांत कावळे, बाबूराव आईनवाड, बाबू मुस्तफा, पंडित पेटकर, लक्ष्मण उदगिरवार, शिनगारे उपस्थित होते.
स्व्कॅश रॅकेटचे मोफत प्रशिक्षण
नांदेड - जिल्हा स्क्वॅश रॉकेट असोसिएशनच्यावतीने दिनांक २ ते १२ जानेवारी दरम्यान मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्नेहनगर येथे हे शिबिर होणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील ५ ते २० वर्ष वयोगटातील खेळाडूंना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष प्रदीप खांड्रे, दयानंद कुमार, बालाजी जोगदंड, राजेश मारावार, रमेश चवरे यांनी केले आहे.