नांदेड : गुरूवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला़ रात्रभर सर्वदूर झालेल्या पावसामुळे पीकांना जीवदान मिळाले आहे़ दरम्यान, जिल्ह्यात ७२़८३ टक्के पेरण्या झाल्या असून पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे़
मृग नक्षत्रावर झालेल्या पावसामुळे वेळेवर पेरण्यांना सुरूवात झाली होती़ परंतु, काही दिवसातच पावसाने उघडीप दिल्याने पन्नास टक्क्याहून अधिक पेरण्या रखडल्या होत्या़ दहा ते बारा दिवसाच्या उघडीपीनंतर झालेल्या पावसामुळे पेरण्यांन पुन्हा गती मिळून जवळपास ७२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या़ मागील चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उगवलेली पीके माना टाकून देत होती़ दरम्यान, गुरूवारी सायंकाळी रिमझिम पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने पीकांना जीवदान मिळाले असून बळीराजा सुखावला आहे़ त्यातच रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे़.
चोवीस तासात १७.७३ मि़मी़ पावसाची नोंदयामध्ये सर्वाधिक ३४ मि़ मी़पाऊस अर्धापूर तालुक्यात झाला आहे़ त्याखालोखाल भोकर - २८़७५ मि़मी़, नांदेड - २७़१३ मि़मी़, मुदखेड - २५़६७ मि़मी़, उमरी - २३ मि़मी़, कंधार- १२़३३ मि़मी़, लोहा - २२़१७ मि़मी़, किनवट - १६़४३ मि़मी़, माहूर - २५़७५ मि़मी़, हदगाव- १३़७१ मि़मी़, हिमायतनगर - १२ मि़मी़, देगलूर - १४ मि़मी़, बिलोली - ६़८० मि़मी़, धर्माबाद - ६ मि़मी़, नायगाव- ८़२० मि़मी़, मुखेड - ७़७१ मि़मी़ असा एकूण २८३़६५ मि़मी़ पाऊस झाला असून गुरूवारी सरासरी १७़७३ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची रिमझिम सुरूच आहे़.
जिल्ह्यात ७३ टक्के पेरणी पूर्णनांदेड जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्याने पेरण्यांना वेळेवर सुरूवात झाली़ आजपर्यंत ७३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर असून त्यापैकी जवळपास सहा लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे़ यामध्ये सर्वाधिक १२०़४० टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे़ सोयाबीनचे सर्वसाधरण क्षेत्र १ लाख ९९ हजार ८९ हेक्टर गृहित धरलेले असताना २ लाख ३९ हजार ७०३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ तर कापसाच्या सर्वसाधारण ३ लाख २३ हजार ७५४ हेक्टरपैकी २ लाख ३० हजार ७९० हेक्टरवर म्हणजेच ७१़२९ टक्के कापसाची लागवड झाली आहे़.