लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड शहर व परिसरात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने सर्वांची धांदल उडाली़नांदेड शहरासह उमरी, अर्धापूर, निवघा, तामसा, माहूर, नवीन नांदेड, हडको-सिडको भागात पावसाने हजेरी लावली़ सोसाट्याच्या वाºयाने नांदेड शहरातील वीजपुरवठा खंडित झाला़ त्याचबरोबर शहरातील अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या़ परिणामी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला़ विजांच्या कडकडाटांसह वादळी वाºयाने अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला़नांदेड शहरातील शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, विसावानगर, दिलीपसिंग कॉलनी, कैैलासनगर, सप्तगिरी कॉलनी, भावसार चौक, सहयोगनगर, देगलूर नाका परिसरासह जवळपास संपूर्ण शहर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. थोडा वारा सुटला तरी वीज जात असल्याने सोशल मीडियावर वीज वितरण कंपनीचे वाभाडे काढणारे संदेश फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे़दरम्यान, मध्यरात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणच्या कर्मचाºयांना अपयश आले़ तर बहुतांश ठिकाणी बॅनर आणि फ्रेम रस्त्यावर पडले होते़ श्रीनगर, बाबानगरसह सखल भागात पाणी साचले़ अनेक भागात नाल्या तुंबून पाणी रस्त्यावरुन वाहत होते.
नांदेडात विजांच्या कडकडाटासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:05 AM