नांदेड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या़प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते़ यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकºयांना सहभागी करून घ्यावे़ तसेच या योजनेची माहिती गावस्तरावर ग्रामसभा, चावडीवाचनाच्या द्वारे देवून जनजागृती करावी, असे निर्देश दिले़प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०१९- २०२० चा पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. शेतकºयांनी २४ जुलैच्या आत आधारकार्ड, स्वयंघोषित पेरा प्रमाण पत्र, सातबारा, नमूना न.८ अ होल्डिंग, बँक पासबुक आदी कागद पत्रासह आॅनलाईन विमा उतरवून घेणे आवश्यक आहे़ या योजनेतंर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे़ पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज, कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे़ न्ाांदेड जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ही योजना लागू आहे़ या योजनेतंर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे आहे़ भात - विमा संरक्षीत रक्कम हेक्टरी ४३ हजार ५०० रूपये, शेतकºयांनी भरावयाचा पीक विमा हप्ता ८७० रूपये, खरीप ज्वार- विमा रक्कम- हेक्टरी २४ हजार ५०० रूपये, विमा हप्ता - ४९० रूपये, तुर - विमा रक्कम- ३१ हजार ५००, विमा हप्ता ६३० रूपये, मुग - विमा रक्कम १९ हजार रूपये - विमा हप्ता ३८० रूपये, उडीद - विमा रक्कम- १९ हजार रूपये, विमा हप्ता- ३८० रूपये, सोयाबीन - विमा रक्कम ४३ हजार रूपये, विमा हप्ता - ८६० रूपये, तीळ- विमा रक्कम- २३ हजार १०० रूपये, विमा हप्ता - ४६२ रूपये, कापूस- विमा संरक्षीत रक्कम हेक्टरी ४३ हजार रूपये, विमा हप्ता - २ हजार १५० रूपये़ कर्जदार शेतकºयांना व बिगर कर्जदार शेतकºयांना पीक विमा उतरवण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे़यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंगृत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असून खरीप हंगातील पिकांसाठी २ तर कापसासाठी ५ टक्के ठेवण्यात आला आहे़ बैठकीस उपजिल्हाधिकारी, कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते़खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतक-यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक आहे़ शेतक-यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे़
पीकविमा योजनेची जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:42 AM
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या़
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश २४ जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतसर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चिती