श्रीक्षेत्र माहूर (नांदेड) : माहूर पौराणिक एैतिहासीक शहर असल्याने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आजही राजे, महाराजे वतनदारांच्या नावे तर काही जमिनी कूळ, इनामी स्वरूपाच्या आहेत. राजे जसवंतसिंह चौहाण तसेच राजे हरनाथसिह चौहाण यांच्या नावावर सर्वात जास्त जमिनी आजही अस्तित्वात आहेत. यापैकी सुमारे १ हजार ९०० एकरपेक्षा अधिक जागेवर राजे जसवंतसिंह यांच्या ११ वारसांनी दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राजे जसवंतसिंह यांना राजे कृष्णराजसिंह राजे, हरनाथसिंह राजे ही दोन मुले होती. दोन्ही मुलांना ११ अपत्ये झाली. यामध्ये प्रतिभा चौहाण, कमलराज चौहाण, माधवी चौहाण, श्रीमती दुर्गा चौहाण, युवराज चौहाण, ताराबाई चौहाण, वीणा चौहाण, सुदेश चौहाण, निकेश चौहाण, क्रांती चौहाण, लिना चौहाण यांचा समावेश आहे. परिसरातील त्यांच्या १९०० पेक्षा जास्त एकर जागा या राजवंशाच्या सातबारावर आहे. या जमिनी परत घेऊन त्या लोकहितोपयोगी संस्थांना देण्याचा निर्णय चौहाण परिवाराने घेतला आहे. जमिनी परत मिळविण्यासाठी वारसांनी संबंधितांकडे पाठपुरावा करणे सुरु केले असून, तहसीलदारांना ११ पानांचे निवेदनही दिले आहे.
लेंडाळ्याची जमीन विकत घेतलेले दीपक उर्फ गजानन किसनराव नारलावार (रा. किनवट) यांनी माहूर नगरपंचायतकडून अकृषीक परवाना घेत लेट आऊट बनवून प्लॉट विक्री करण्याच्या उद्देशाने जागा सपाटीकरण करणे सुरु केले होते. राजाचे वारसदार प्रतिभा चौहाण, संदेश चौहाण, क्रांतीसिंह चौहाण यांनी तेथे जावून कामास मज्जाव केला. याच कारणावरुन दोन्ही गटात वादावादी होवून एकमेकांना शिवीगाळ झाली. प्रकरण पोलिसात पोहोचले. पोलिसांनी गुन्हे नोंदविले असून, संबंधितांना समजही दिली आहे.
राजे जयवंतसिंह यांच्या नावे सातबारामाहूर शहरसह तालुक्यात राजे जयवंतसिंह यांच्या नावे पडसा, वडसा, राजगढ, शेकापूर, लखमापूर यासह अनेक गावात १९०० पेक्षा जास्त एकर जागा सातबारावर आहे. या जमिनींवर कर्ज उचलणे, परस्पर विक्री करणे, तुकडेबंदी आदी प्रकार करण्यात आले. सध्या या जमिनीवर मोठ्या इमारती उभ्या आहेत.