नांदेड- शहरातील भारत स्काउट्स-गाइड्स जिल्हा कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. उपशिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक गाइड एस.एम. तांडे, कैलास कापवार, साईनाथ ठक्करवार आदी उपस्थित होते.
जातपडताळणी कार्यालय
नांदेड- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती येथे १२ जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष पी.बी. खपले यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सदस्य सचिव आ.ब. कुंभारगावे, एस.जे. रणभीरकर, व्ही.बी. आडे, ए.एम. झंपलवाड, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, संजय पाटील, मनोज वाघमारे आदी उपस्थित होते.
विजयनगर जयंती साजरी
नांदेड- शहरातील विजयनगर भागात युवा प्रतिष्ठान व विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवानराव डक यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संभाजी शिंदे, बाबुराव कदम, दिगंबर पावडे, आनंद जाधव, मंगेश माेतेवार, धीरज मराठे, संतोष कदम, प्रा. अनिल कदम, पंजाबराव कदम आदी उपस्थित होते.
प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात जयंती
नांदेड- शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ॲड. नितीन थोरात, सुभाष लोखंडे, विजय हिंगोले, रवी काेकरे, अशोक हटकर, गया कोकरे, चैतराबाई चिंतोरे, सविता नांदेडकर, शिल्पा लोखंडे, शोभा गोडबोले, श्याम नरवाडे, सुमन वाघमारे, सत्त्वशीला खिल्लारे, गयाबाई नरवाडे आदींची उपस्थिती होती.
विद्यापीठात जयंती साजरी
नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. रवी सरोदे, डॉ. राजाराम माने, डॉ. विठ्ठलसिंह परिहार, डॉ. अशोक कदम, शिवराम लुटे आदी उपस्थित होते.