धर्माबाद : येथील रजिस्ट्री कार्यालयात एक महिन्यापासून आॅनलाईन सेवा बंद असल्यामुळे नागरिक भीतीने रजिस्ट्री करण्यास येत नाहीत, त्यामुळे ७५ टक्के रजिस्ट्रीवर परिणाम झाला आहे़ रजिस्ट्री खोळंबल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे पाहायला मिळत आहे.धर्माबाद शहरातील आंध्रा बसस्थानकनजीक एका भाड्याच्या इमारतीत रजिस्ट्री कार्यालय आहे. या कार्यालयअंतर्गत एकूण ५७ गावे आहेत. शेती, प्लाटिंग व महसूल या विभागाचे खरेदीखत, गहाणखत, सौदाचिठी, मृत्यूपत्र, करारनामा, रिलीजडीड आदी कामे करण्यात येतात. १ जानेवारी २०१९ पासून आॅनलाईन बंद आहेत. यामुळे रजिस्ट्री होत नसल्याने लाखोंचा महसूल तर शासनाचा बुडला, त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होत आहे. आज, उद्या आॅनलाईन सुरू होईल म्हणून नागरिक हेलपाटे मारत आहेत.दुसरीकडे आॅफलाईन रजिस्ट्री करण्यास नागरिक भीत आहेत. जे संबंधित आहे, ज्यांचा पुढच्या व्यक्तीवर भरवसा आहे़ अशीच आॅफलाईन रजिस्ट्री होत आहे. आॅफलाईनवरचे फेरफार तलाठी करीत नसल्याने शेतकरी हैराण आहेत.आॅनलाईन बंद असल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली असून, नागरिकांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे, तलाठी आॅनलाईनशिवाय रजिस्ट्री करत नाहीत. सदरील अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर आॅनलाईन चालू केल्यास तालुक्यातील नागरिकांची कामे वेळेवर होतील, असेही बोलल्या जात आहे. आॅनलाईन न झालेल्या रजिस्ट्रीचे एक महिन्यापासून कोणत्याच शेतकऱ्यांचा फेरफार झालेला नाही़ ज्यांना पैशाची गरज आहे, अशा प्लाटिंग विक्री करणाºयांचीसुद्धा रजिस्ट्री थाबंली आहे. महिन्यात दोनशे दोनशे रजिस्ट्री होत होत्या मात्र आॅफलाईनमध्ये केवळ पन्नासच्या आसपास होत आहेत. ७५ टक्के रजिस्ट्रीवर परिणाम पडला आहे, अशी माहिती प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी आर. जी. झंपलवाड यांनी दिली.
धर्माबादेत ऑनलाईनमुळे रेजिस्ट्रीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:50 AM
येथील रजिस्ट्री कार्यालयात एक महिन्यापासून आॅनलाईन सेवा बंद असल्यामुळे नागरिक भीतीने रजिस्ट्री करण्यास येत नाहीत, त्यामुळे ७५ टक्के रजिस्ट्रीवर परिणाम झाला आहे़ रजिस्ट्री खोळंबल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठळक मुद्देधर्माबादेत ‘आॅनलाईन’मुळे रजिस्ट्रीचा होतोय खोळंबा