हदगाव : येथील दत्तबर्डी तांड्यावरील एका शेतक-याचा हदगावच्या पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला़ संबंधितावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढला आहे़ शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला़ मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून कृउबासच्या कर्मचा-यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे़हरीसिंग सिंघा राठोड (वय ६०) या शेतक-याचे सिमेंट काँक्रीटचे पक्के घर कृषी उत्पन्न बाजार समिती हदगावला लागून होते़ या घराचा दावा दिवाणी न्यायालय, हदगाव येथे चालू होता़ मयताच्या मुलास मनाई हुकूम मिळालेला होता़ तरी कृषी उत्पन्न समितीने कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता घर पाडले आणि फिर्यादीचा कुठलाही सदस्य त्यांना कोणतीही अडचण न करता कृउबासच्या सचिवाने या कुटुंबावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला़ त्यामुळे पोलिसांनी मयतास ताब्यात घेतले़ त्यामुळे त्यांचे घर पाडले़याचा ताण सहन न झाल्याने राठोड यांचा मृत्यू झाला़ म्हणून मयताचा मुलगा विजयसिंग हरीसिंघ राठोड यांच्या तक्रारीवरून कृउबास सभापती श्यामराव चव्हाण, समिताीचे सचिव अविनाश जाधव, सहसचिव संदीप चव्हाण, किशोर वानखेडे, प्रदीप श्रीराम चव्हाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़आज शुक्रवारी नांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ अधिका-यांच्या निगराणीत इनकॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली़ त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले़ परंतु, नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यविधी करण्याऐवजी मृतदेह हदगाव पोलीस ठाण्यात आणून ठेवले व मयताच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला़नातेवाईक तसेच गोर संघटनेचे पदाधिकारी मयताच्या घरी गेले़ यामुळे पोलीस प्रशासनाच्या ताणात वाढच झाली़ पोलिसांनी याप्रकरणी ३१ जानेवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हा तपास सीबीआयकडे सोपविल्याचे विभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे यांनी सांगितले़ परंतु, गोर संघटनेने आक्रमक पवित्रा घेत नांदेड जिल्हा बंद करण्याचे आवाहन केले़संबंधित पोलिसांवर गुन्हा नोंदवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, या मतावर गोर संघटना व नातेवाईक ठाम असल्याने रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता़
- नांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी वरिष्ठ अधिका-यांच्या निगराणीत इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली़ त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले़परंतु, नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यविधी करण्याऐवजी मृतदेह हदगाव पोलीस ठाण्यात आणून ठेवला़