लाखो प्रवाशांना दिलासा; अकोला-अकोटदरम्यान ब्रॉडगेज लाईन कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 07:29 PM2020-07-28T19:29:58+5:302020-07-28T19:32:01+5:30

या नवीन रेल्वे स्थानकावर उंच प्लॅटफॉर्म तसेच इतर जरुरी प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत.

Relief to millions of passengers; Broadgauge line operation between Akola-Akot started | लाखो प्रवाशांना दिलासा; अकोला-अकोटदरम्यान ब्रॉडगेज लाईन कार्यान्वित

लाखो प्रवाशांना दिलासा; अकोला-अकोटदरम्यान ब्रॉडगेज लाईन कार्यान्वित

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भाला मध्य प्रदेशासोबत रेल्वेने जोडण्यात यश१७५ किलोमीटरचे काम तीन टप्प्यांत

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेमध्ये अकोला ते खांडवा मीटर गेज रेल्वे लाईनचे  ब्रॉडगेज परिवर्तन करण्याचे काम अनेक वर्षापासून शिल्लक होते.  भारतीय रेल्वेच्या युनी गेज परिवर्तन संकल्पनेतून ही मीटर गेजची लाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यापैकी अकोला ते अकोटदरम्यानची लाईन कार्यान्वित करण्यात आली आहे.

पहिला टप्प्यातील अकोला ते अकोट या  ४४ कोलोमीटर  मीटर गेज रेल्वे लाईनचे परिवर्तन  ब्रॉड गेजमध्ये करण्यात येऊन ही ४४ किलोमीटर ब्रॉड गेज लाईन रेल्वे गाडी चालविण्याकरिता अधिकृतरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे. या ४४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर ३८ छोटे रेल्वे पूल आणि २ मोठे रेल्वे पूल या विभागात बांधण्यात आले आहेत. याशिवाय आणखी एक मोठा रेल्वे पूल बांधण्यात आला आहे़ ५ रेल्वे स्थानक नव्याने बांधण्यात आली आहेत. 

या नवीन रेल्वे स्थानकावर उंच प्लॅटफॉर्म तसेच इतर जरुरी प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. २२ रेल्वे गेट जे मीटर गेज दरम्यान उपलब्ध होते, त्या सर्व २२ रेल्वे गेटच्या ठिकाणी भुयारी पूल बांधण्यात आले आहेत़ ज्यामुळे प्रवाशी सुविधेत वाढ झाली आहे. या भुयारी पुलामुळे रोड प्रवास अखंडपणे सुरु ठेवता येईल. अकोला रेल्वे स्थानकावरील यार्ड रेमॉडेलिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले. सध्या उपलब्ध तीन लाईन (एक  मेन लाईन आणि दोन लूप लाईन)  सोबत चौथी लूप लाईन टाकण्यात आली आहे.  


१७५ किलोमीटरचे काम तीन टप्प्यांत
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येणाऱ्या अकोला-खांडवा हा जवळपास १७५  किलोमीटरच्या मार्गावरील मीटर गेज लाईन ब्रॉड गेज परिवर्तन करण्यासाठी २००८-०९ मध्ये  २ हजार ६७  कोटी रुपये  मंजूर करण्यात आले असून दमरेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. जवळपास १७५  किलोमीटरचे कार्य तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यात अकोला-अकोट-४४  किलोमीटर, दुसरा टप्पा अकोट ते अमलाखूर्द हा ७७ किलोमीटरचा तर तिसरा टप्पा अमलाखूर्द-खांडवा-५४ किलोमीटरचा आहे.

मराठवाडा व विदर्भासाठी महत्वाचे
अकोला ते खांडवा गेज परिवर्तनाचा भाग असलेले अकोला-अकोट ब्रॉडगेजचे कार्य पूर्ण झाल्यामुळे अकोला येथून खांडवा जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होईल. हा रेल्वे मार्ग मराठवाडा व विदर्भाला मध्यप्रदेशसोबत जोडण्यात महत्त्वाचा ठरेल़  
- गजानन माल्या, महाव्यवस्थापक दमरे

Web Title: Relief to millions of passengers; Broadgauge line operation between Akola-Akot started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.