देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात; राहुल गांधींनी यावर बोलावे, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
By सुमेध उघडे | Published: November 5, 2022 06:53 PM2022-11-05T18:53:04+5:302022-11-05T18:54:54+5:30
गुजरात निवडणुकीनंतर देशातील धार्मिक स्वातंत्र्य नष्ट होईल प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले भाकीत
नांदेड: धम्मदीक्षा सोहळ्यात सहभाग घेतल्याने २२ प्रतिज्ञावरून आपचे मंत्री राजेंद्र पाल यांनी राजीनामा द्यावा लागला आहे. देशातील धार्मिक स्वातंत्र्य गुजरात विधानसभा निवडणुक निकालानंतर नष्ट होईल, असे भाकीत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी याबाबत कोणती तरी भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नांदेड येथे आज झालेल्या धम्म मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे देशात एकीकडे संविधानाची समतेची तर दुसरीकडे मनुस्मृतीची असमतेची व्यवस्था सुरु आहे. मनुस्मृती जाळा,जातीवर आधारित पुरोहित वर्गावर कायद्याने बंदी आणा. हिंदू विश्वविद्यालय उघडा. यातून डिग्री घेऊन बाहेर पडणाराच पुजाराचा अर्चा करेल. हे मान्य असेल तर आम्ही आरआरएस सोबत जाऊ, असे खुले आव्हान आंबेडकरांनी केले
आयातनीतीतून मोठा भ्रष्टाचार
नरेंद्र मोदींच्या आयातनीतीतून मोठा भ्रष्टाचार होत आहे. पाम तेलाची आयात मोदींनी बंद केली पण व्यापाऱ्यांनी तेच तेल आयात करून महाग विंकल. इथिनोल वापरायची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव मिळायला हवा पण तो मिळत नाही, कापसाचे भाव १२ हजारापर्यंत गेला पाहिजे. पण सरकार व्यापाऱ्यांचे असल्याने देखील भाव मिळणार नाही. आयात करून आफ्रिकेतून स्वस्त कापूस येत आहे सरकारने आयातीस का परवानगी दिली हे राहुल गांधी यांनी मोदींना विचारावे.
देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात
आम्ही लॉंगमार्च काढले आहेत. रोज यात्रेत चालणे कष्टाचे आहे. यातून राहून गांधी यांचे व्यक्तिमत्व बदलत आहे. पण यातून प्रश्न विचारले जात नाहीत. यात्रा झाली की पुन्हा सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्यावर सुब्रमण्यम स्वामी प्रश्न विचारातील. यामुळे भारत जोडो यात्रेतून मोदींनी प्रश्न विचारावेत अन्यथा हा एक बुडबुडा ठरेल. दिल्लीत आपचे एक मंत्री राजेंद्र पाल धम्मदीक्षा समारंभात उपस्थित होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या २२ प्रतिज्ञावरून पाल यांना राजीनामा द्यावा लागला. देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. यावर राहुल गांधी यांनी काहीतरी बोलावे, भूमिका घ्यावी, काहीच मत न मांडणे हे सगळ्यात धोकादायक असते.गांधी यांनी नांदेडच्या सभेत यावर बोलावे असे आवाहन आंबडेकर यांनी केले.