तुंगेनवार यांना पीएच.डी
नांदेड- अमोल गंगाधरराव तुंगेनवार यांना ‘जैवतंत्रज्ञान’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. डॉ. बी.एस. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध सादर केला होता. या यशाबद्दल डॉ. आर.एम. मुलानी, प्रा.डॉ. एल.एच. कांबळे यांनी तुंगेनवार यांचे कौतुक केले.
शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार
नांदेड- कॉस्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने मनपाचे नुतन शिक्षणाधिकारी परमेश्वर गोणारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मारोती कांबळे, महेंद्र आठवले, मुस्तफा खान, प्रभु सज्जन, कल्पना मुळे, केरबा मगरे, गौतम कसबे आदी उपस्थित होते.
योग शिबिराचा समारोप
नांदेड- पूर्णा रोड येथे सिताराम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या योग शिबिराचा समारोप पार पडला. या शिबिरात महारुद्र माळगे, महानंदा माळगे, किशन भवर, राणीताई दळवी, स्वाती बेंबरे, हनुमंत ढगे, नितीन चव्हाण आदी योग शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
पिडीत कुटुंबांचे पुनर्वसन करा
नांदेड- लोहा तालुक्यातील शिवणी येथील हल्ला झालेल्या पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेच्यावतीने सुखदेव चिखलीकर, भारत मगरे, नितीन देढे, किरण चित्ते, विशाल गायकवाड, सत्यपाल नरवाडे आदींनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
रविदास महाराज जयंती साजरी
नांदेड- शहरातील रामानंदनगर येथील नवनिकेतन प्राथमिक शाळेत संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक पी.बी. टोंपे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
बौद्ध वधु-वर परिचय मेळावा
नांदेड- बहुजन संघर्ष सेना व प्राची बौद्ध वधु-वर सुचक केंद्रातर्फे ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज मंगल कार्यालय, मालेगाव रोड येथे बौद्ध वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील १५ वर्षापासून हा मेळावा घेण्यात येत असल्याचे संयोजक वैभव चिखलीकर यांनी सांगितले.
आजाद समाज पार्टीची मागणी
नांदेड- अर्धापूर येथील प्रज्ञा बौद्ध विहारातील महापुरुषांची पुतळे नगरपंचायतने काढले आहेत. हे पुतळे पुन्हा बसवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी आजाद समाज पार्टीच्यावतीने दिनेश लोणे पाटनूरकर यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन पाठविले आहे.