कंधार : कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन मौजे पेठवडज, ता.कंधार येथे दि. २७ जून रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
अध्यक्षस्थानी आमदार डॉ.तुषार राठोड होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे देविकांत देशमुख, कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कंधारचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, पेठवडजचे मंडळ कृषी अधिकारी विकास नारळीकर, प्रभारी कृषी पर्यवेक्षक संजय माळी, विजय कळणे, कृषी सहायक सागर जवादे, सुनील देशमुख, नामदेव कुंभारे, सतीश वाघमारे, स.सरताज, आत्माचे विनोद पुलकुंडवार, समूह सहायक देवकांबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचलन संभाजी वडजे, तर प्रास्ताविक विकास नारनाळीकर यांनी केले. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, डॉ.देविकांत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कृषी संजीवनी योजनेंतर्गत विविध विषयांवर तांत्रिक माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. सोयाबीन बियाणे उगवणशक्ती, रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड, बीज प्रक्रिया, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर व खतांची बचत, एक गाव, एक वाण, पिकावरील कीडरोग व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळी, विविध योजनांची माहिती, प्रमुख पीक उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान आदींवर माहिती व प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी नारायण गायकवाड, दत्ता गायकवाड, आनंदा लोहबंदे, एकनाथ डाकोरे, साईनाथ पुटवाड, धोंडीराम गडमवाड, परमेश्वर बकवाड, गिरधारी केंद्रे उपस्थित होते.