नांदेड : वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. त्यात नांदेडच्यावंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी सहभाग नोंदवत शहरात बंद पाळला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला विरोध करत हा बंद पाळण्यात येत आहे. काही शाळांनी कालच सुट्टी जाहीर केली होती तर काही शाळांनी आज सकाळी सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. दरम्यान, सिडको हडको भागात बंदचे आवाहन करीत कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली आहे.
स्कूलबसेस न परत पाठवले वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंनद नगर येथे स्कूलबसेस थांबवत त्यांना शाळेच्या दिशेने जाऊ न देता परत पाठवल्या.अनेक शाळांमध्ये परिक्षा सुरु आहेत. यामुळे बंदमधून शाळांना वगळले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पालकांनि दिली. दरम्यान आनंद नगर भागात सकाळी स्कूल बसेसची मोठी रांग लागली होती