चूक कोणाची :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ आपणासही मिळावा म्हणून सर्वच शेतकऱ्यांनी कागदपत्रे तलाठी यांच्याकडे जमा केली. सर्व प्रक्रिया होऊन पात्र व अपात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आणि ती रक्कम उचल करून शेतकऱ्यांनी खर्चही केली. आता दुसरा हप्ता कधी मिळणार म्हणून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. तेव्हाच जर तलाठी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली असती तरी हा प्रश्न निर्माण होत नव्हता. मग चूक कोणाची अन् शिक्षा कोणाला? असा प्रश्न पडत आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाने धोका दिला, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. मग रक्कम कशी परत करणार, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला तो घेऊ द्या; परंतु यानंतर लाभ देऊ नका, असे काही शेतकरी मत व्यक्त करीत आहेत. शिरड, ता. हदगाव येथे 44 शेतकरी अपात्र आहेत.
अप्राप्त शेतकऱ्यांना आलेली रक्कम परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:12 AM