माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 01:58 PM2021-06-26T13:58:18+5:302021-06-26T14:00:24+5:30
ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
नांदेड : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. ही न्यायालयीन प्रकिया असली तरी त्यात सूडबुद्धी असल्याचे दिसतंय अशी टीका चव्हाण यांनी केली. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळा परिसरात ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसच्यावतीने केंद्रसरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी चव्हाण बोलत होते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई- मंत्री
— Lokmat (@MiLOKMAT) June 26, 2021
अशोक चव्हाणhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/RLZlfzq9jw
ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील आरक्षणाची पद्धतच भाजपला संपवायचे आहे. तसेच त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईबद्दल सुद्धा मत व्यक्त केले. माजी मंत्री देशमुख यांच्यावरील कारवाई नायालयीन प्रक्रिया दिसत असली तरी त्यात सुद्बुद्दी दिसून येत आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु यातील अनेकांना मास्कचा विसर पडला होता. सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडाला होता