नांदेड : महसूल विभागाने बुधवारी जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यातील ९ तहसीलदार संवर्गातील अधिका-यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर इतर अधिका-यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश बजावले आहेत.बिलोली येथे नियुक्त झालेले उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण अद्यापपर्यत तेथे रुजू झालेले नव्हते. नव्या आदेशानुसार त्यांची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर बदली झाली आहे. पठाण रुजू न झाल्याने आता तेथे रिक्त झालेल्या पदावर गंगाखेड (जि. परभणी) येथील उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांना पदस्थापना देण्यात आली आहे. नांदेड येथील विशेष भूसंपादन अधिकारी सुनील महिंद्रकर यांची बीड येथे रिक्त असलेल्या उपजिल्हाधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. तर नांदेड येथील उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची लातूर येथे रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे. आता प्रदीप कुलकर्णी यांच्या बदलीने रिक्त होणाºया नांदेड उपविभागीय अधिकारी या पदावर जालना येथून ब्रिजेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तर रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून देवेंद्र कटके हे नांदेड येथे रुजू होणार आहेत. कटके हे पूर्वी जालना येथे विशेष भूसंपादन अधिकारी होते.दरम्यान, महसूल विभागाने जिल्ह्यातील तहसीलदार संवर्गातील पदस्थापना देण्याबाबतचे आदेशही बुधवारी जारी केले. त्यानुसार हदगाव येथील तहसीलदार संदीप कुलकर्णी यांची जळकोट (जि. लातूर) येथे बदली झाली आहे. मुखेड येथील तहसीलदार अतुल जटाळे यांची शिरुरअनंपाळ (जि. लातूर) येथे बदली करण्यात आली आहे. तर हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिरादार यांची सोनपेठ (जि. परभणी) येथे बदली झाली आहे.मुदखेडचे तहसीलदार सुरेश घोळवे यांची देवणी (जि. लातूर) नांदेड येथील संजय गांधी योजनेचे तहसीलदार दिनेश झांपले यांची मुदखेडचे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांची बीड जिल्ह्यातील वडवणी येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. कंधारच्या तहसीलदार संतोषी देवकुळे यांची पालम (जि.परभणी) येथे तर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांची माहूर येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. भोकरचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांची उदगीर येथे तर माहूरचे तहसीलदार विजय अवधाने यांची परंडा (जि. उस्मानाबाद) येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. अधिका-यांच्या खांदेपालटामुळे महसूल विभागात नवी टीम कार्यरत होणार आहे.नवे तहसीलदार लवकरच स्वीकारणार पदभारमुखेडचे तहसीलदार म्हणून काशीनाथ पाटील रुजू होत आहेत. तर हिमायतनगरचे तहसीलदार म्हणून उस्मानाबाद येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एन. बी. जाधव लवकरच पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. भोकर तहसीलदार म्हणून चाकूर (जि.लातूर) येथील भरत सूर्यवंशी येणार आहेत. तर कंधारच्या तहसीलदारपदी आता गेवराईचे सखाराम मांडवगडे पद्भार घेणार आहेत. नांदेड संजय गांधी योजनाच्या तहसीलदारपदी सेनगाव (जि. हिंगोली) येथून वैशाली पाटील यांची बदली झाली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य विभागाचे तहसीलदार म्हणून लातूर येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रसाद कुलकर्णी सूत्रे स्वीकारणार आहेत. हदगाव तहसीलदारपदी वंदना निकुंभ यांची नियुक्ती झाली आहे. त्यापूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.
महसूल विभागातील कारभारी बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:00 AM
महसूल विभागाने बुधवारी जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
ठळक मुद्देतीन उपजिल्हाधिकारी जिल्ह्यातील नऊ तहसीलदारांच्या बदल्या