शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रिक्षाला चिरडले;पती-पत्नी ठार,१७ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 9:09 PM

जखमींना वाहनातून जेसीबीच्या साहायाने बाहेर काढण्यात आले

कंधारः बस स्थानकाकडून येणाऱ्या आयशर ट्रकचे ( क्रमांक एम एच १३ आर २२२४ ) ब्रेक निकामी झाल्याने महाराणा प्रताप चौकात रिक्षावर आदळले. या भीषण अपघातात गोविंद सटवाजी भंगारे (६५) व मथुराबाई गोविंद भंगारे (५५) हे पती-पत्नी अपघातात ठार झाले. तर इतर १७ जण जखमी झाले आहेत. ८ गंभीर जखमींना नांदेडला उपचारासाठी पाठविण्यात आले.

 शहरात दि.१६ ऑगस्ट रोजी आठवडी बाजार होता. भाजीपाला , फळभाज्या व फळ खरेदीसाठी गर्दी होती. दुपारी ४.३० ते ५ च्या सुमारास लोहाकडून येणारे आयचर ट्रक वाहन सिंमेट गटू घेऊन हानेगावला जात होते. परंतु, बसस्थानका जवळ वाहनाचे ब्रेक निकामी झाले. ट्रक थेट रिक्षा ( क्रं एम.एच.२६ बीक्यू १९३४) वर आदळले.त्यामुळे त्या वाहनातील ३ प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील गोविंद सटवाजी भंगारे व मथुराबाई गोविंद भंगारे यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.परंतु डॉक्टरांनी पती-पत्नीला मृत घोषित केले.

तसेच दुचाकी (क्रमांक एम एच २६ एस ३५७१) या वाहनाचे नुकसान झाले.अपघातात इतर  १७ जण जखमी झाले. त्यात गंभीर ८ जणांना नांदेडला उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

जखमीची नांवे अशी १)रामेश्वर बालाजी भंगारे वय १७ रा बाबुळगाव २)शेख जावेद ६० रा हतईपूरा ३)शेख जाकिर २५ हत्तईपूरा ४) शेख रऊफ शेख घडी ४५ दर्गापूरा ५ )लक्ष्मीबाई सोपान वाघमारे ६५ रा.शेकापूर ६)शेख महेमूद ५० दर्गापूरा ७) नामदेव लक्ष्‍मण जाधव ४६ रा भोजूतांडा ८)बालाजी केशव मुंडे ३० बाबुळगाव ९)आदिनाथ मारोती जायभाये २१ बोरी १०)सत्तार खान अहमद खान वय ३४ वर्षं हतईपुरा ११) तनवीर हुसेन ३२ दर्गापूरा १२)शेख सद्दाम शेख हुसेन वय २७ वर्ष १३)भिवसन जळबा भंगारे वय ६० वर्ष बाबूळगाव १४)शंकर गंगाराम वय २५ वर्ष  १५)  शेख गौस शेख नबीसाब कंधार वय २९ वर्ष १६)शेख नसीब खान कंधार वय २९ वर्ष १७) माधव जायभाये बोरी वय ४५ वर्ष यांचा जखमीत समावेश आहे.

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे,पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,सहाय्यक पो.नि. सातानुरे, संग्राम जाधव ,गणाचार्य ,सुनील पत्रे,गुरूनाथ कारामुंगे आदी दाखल झाले.नगरसेवक अ.मन्नान चौधरी, प्रा.डॉ. पुरूषोत्तम धोंडगे, माजी सैनिक विकास समितीचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड,स्वप्नील लुंगारे,अँड.कलीम अन्सारी , परशुराम केंद्रे,शेख  युनुस आदीनी मदत केली.खाजगी जेसीबी आणून वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले.  जखमीवर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. रवी पोरे ,डॉ. भगवान जाधव ,डॉ. रामभाऊ तायडे,डॉ. यशवंत तेलंग, डॉ. संतोष पदमवार,डॉ. सय्यद जिलानीसह अधिपरिचारीका नंदा सोनकांबळे, शितल कदम,शिल्पा केळकर,योगेश्वरी कबीर ,सत्वशीला कांबळे,अशोक दुरपडे ,गजानन केंद्रे आदीनी सहकार्य केले. या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड