नांदेड : देशभरात नावाजलेल्या नांदेडातील आयुर्वेदिक आणि युनानी रसशाळेमागील शुक्लकाष्ठ संपत आले असून कच्चा माल खरेदीचे दरपत्रक नसल्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून बंदच पडली होती़ आता ही रसशाळा नव्या दमाने सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून त्यासाठी नुकताच जवळपास सात लाख रुपयांचा कच्चा माल खरेदी करण्यात आला़ परंतु, खरेदी केलेल्या या कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत़नांदेडातील आयुर्वेदिक आणि युनानी रसशाळेतून एकेकाळी देशभरात औषधींचा पुरवठा करण्यात येत होता़ या ठिकाणी तयार होणाऱ्या औषधीला मोठी मागणी होती़ राज्य सरकारकडूनही प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी या ठिकाणाहून औषधी खरेदी करण्यात येत होती़ परंतु, गेल्या काही वर्षांत शासनाच्या उदासीन धोरणामुळे या रसशाळेला ग्रहण लागले होते़ कच्चा माल खरेदीचे दरपत्रकच निश्चित न केल्यामुळे औषधनिर्मिती ठप्प पडली होती़ त्यामुळे रसशाळेत जवळपास पन्नास लाखांहून अधिकची औषधी तशीच पडून होती़ कच्चा माल खरेदीचे दरपत्रक निश्चित करण्यासाठी शासनाकडून लावण्यात आलेल्या विलंबामुळे या रसशाळेला टाळे लागले होते़त्यात आता पुन्हा एकदा ही रसशाळा नव्या दमाने सुरु करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे़ रसशाळेच्या रंगरंगोटीसह कच्चा माल खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या़ त्यानुसार, जवळपास सात लाख रुपयांचा कच्चा माल खरेदी करण्यात आला़ परंतु, खरेदी केलेल्या या कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत़ रसशाळेशी संबंधित असणाऱ्यांनीच हा कच्चा माल उच्च गुणवत्तेचा नसल्याचे म्हटले आहे़ त्यामध्ये अश्वगंधापासून पावडर निघणारे पावडर अतिशय कमी असेल़तर सुंठही चायना मेड आहे़ त्याचा परिणाम औषधींच्या गुणवत्तेवर होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे़ त्यामुळे रसशाळेसाठी शासन एकीकडे लाखो रुपये खर्च करीत असताना त्याचा योग्य विनियोग होणे गरजेचे आहे़ अन्यथा रसशाळा सुरु होवूनही पुन्हा टाळे लागण्याची टांगती तलवार तिच्यावर कायम राहील़
रसशाळेला गतवैभव मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:27 AM
देशभरात नावाजलेल्या नांदेडातील आयुर्वेदिक आणि युनानी रसशाळेमागील शुक्लकाष्ठ संपत आले असून कच्चा माल खरेदीचे दरपत्रक नसल्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून बंदच पडली होती़
ठळक मुद्देकच्चा माल खरेदी : गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह