यंत्रणांच्या १७९ कामांवर १ हजार ४११ मजूर कार्यरत आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत व यंत्रणांची १ हजार ४४ कामे सुरू असून, ८ हजार २९४ मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे.
धर्माबाद तालुक्यात सर्वात कमी कामे
जिल्ह्यात सर्वात कमी कामेही धर्माबाद तालुक्यात सुरू आहे. येथे केवळ ३ कामे सुरू असून, १२ मजुरांना ग्रामपंचायतीमध्ये रोजगार मिळाला आहे. सामाजिक वनीकरणाची धर्माबाद तालुक्यात ३० कामे सुरू आहेत. या संपूर्ण तालुक्यात ७ कामांवर ४२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. सर्वाधिक कामे ही माहूर व कंधार तालुक्यात सुरू आहेत. माहूर तालुक्यात १२७ कामांवर १ हजार ५५४, तर कंधार तालुक्यात १५० कामांवर ५३४ मजुरांना रोजगार मिळाला आहे, तर दुसरीकडे हिमायतनगर तालुक्यातही ५० कामांवर ९१४ मजूर कार्यरत आहेत.