शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

मतदार नोंदणीसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:42 AM

येणारी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रमुख पक्षांकडून सुरु झाली आहे. भाजपा, काँग्रेसकडून सदस्य नोंदणीसह मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या ‘शक्ती अ‍ॅप’ द्वारे सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार जणांनी यावर नोंदणी केली आहे. दुसरीकडे भाजपाकडून मिस्डकॉलद्वारे सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे.

ठळक मुद्देबुथवाईज जबाबदारी : काँग्रेस, भाजपाकडून आॅनलाईन आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येणारी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रमुख पक्षांकडून सुरु झाली आहे. भाजपा, काँग्रेसकडून सदस्य नोंदणीसह मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या ‘शक्ती अ‍ॅप’ द्वारे सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार जणांनी यावर नोंदणी केली आहे. दुसरीकडे भाजपाकडून मिस्डकॉलद्वारे सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे.येणाऱ्या निवडणुकांची सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणुकांच्या अनुषंगाने पात्र मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम सध्या जिल्हाभरात राबविला जात आहे. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित हा कार्यक्रम आहे. मतदारयादी नावनोंदणी व दुरुस्तीसाठी ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत संबंधित मतदान केंद्रावर बीएलओमार्फत विहित नमुन्यात फॉर्म भरुन द्यायचा आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांची सध्या मतदार नोंदणी सुरु आहे. येणाºया निवडणुकांसाठी याच मतदारयादीचा उपयोग केला जाणार असल्याने यंदा प्रशासनाबरोबरच प्रमुख पक्षांनीही मतदारयादी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम चांगलाच मनावर घेतल्याचे दिसते.काँग्रेसने जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. नोंदणीसाठी बुथवाईज कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका बुथमधील मतदान नोंदणीसाठी काँग्रेसचे दहा कार्यकर्ते पाठपुरावा करीत आहेत. या कार्यकर्त्यांकडून झालेल्या नोंदणीचा आढावा घेण्यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांची दुसरी फळी उभारली आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची, विद्यार्थ्यांची नोंदणी करुन घेण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. दुसरीकडे भाजपानेही मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावल्याचे दिसून येते. एका बुथमध्ये किमान ५० नवमतदारांची नोंदणी झाली पाहिजे, असे पक्षश्रेष्ठींचे निर्देश आहेत.त्यामुळे बुथवाईज कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मतदार नोंदणीचा पक्षाच्या मुंबईमधील वॉररुममधून दररोज आढावा घेतला जात आहे. नोंदणी केलेल्या नवमतदारांची नावे पक्षाला मेलद्वारे पाठविण्यात येत आहेत.निवडणूक तयारीत शिवसेना पिछाडीवरचआगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस, भाजपा हे प्रमुख पक्ष लागले आहेत़ शिवसेना मात्र पक्षातंर्गत बाबीतच अडकली आहे़ महापालिका निवडणुकीत दारुण पराभवातून शिवसेना अद्याप सावरलीच नाही़ जिल्ह्याचे पालकमंत्री पद रामदास कदम यांच्याकडे आल्यानंतर सेनेची फेरउभारणी होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र तीही आजघडीला तरी फोल ठरली आहे़ महापालिका निवडणुकीपासून नांदेडचे उत्तर जिल्हा प्रमुखपद अद्यापही रिक्तच आहे़ इतर पदेही भरण्यात आले नाही़ परिणामी सेनेवरील मरगळ कायम आहे़ त्यामुळे निवडणूक तयारीत सेना पिछाडीवरच आहे़प्रशासनाचीही तयारीलोकसभा निवडणुकीचे वारे राजकीयस्तरावर वाहत आहे. त्याचवेळी प्रशासकीय स्तरावरही या निवडणुकीची तयारी केली जात आहे. मतदारयादी अंतिम करण्यासह मतदान प्रक्रियेसाठी लागणाºया ईव्हीएम मशीन, जनजागृती आदींचीही तयारी सुरु आहे.काँँग्रेसच्या सदस्य नोंदणीला प्रतिसादमतदार नोंदणीबरोबरच पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठीही प्रमुख पक्षांकडून यंत्रणा कार्यरत आहे. काँग्रेसतर्फे ‘शक्ती अ‍ॅप’ विकसित करण्यात आले असून या अ‍ॅपवर काँग्रेस सदस्यांची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. सदस्य नोंदणीत नांदेड जिल्हा आघाडीवर असून सुमारे ३५ हजार जणांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यात उत्तर नांदेडमधून ८ हजार ५००, दक्षिण नांदेडमधून ६ हजार ७००, भोकर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ७ हजार तर नायगाव मतदारसंघातून अडीच हजार नागरिकांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण