नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएच़ डी़ साठी विद्यापीठाकडून संशोधक विद्यार्थ्यांकडून कोर्सवर्क बंधनकारक केले आहे़ मात्र यावर्षी आरआरसी होण्यापूर्वीच विद्यापीठाने कोर्सवर्कची घाई केल्याने नवीन पीएच़ डी़ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे़यावर्षी पीएच़ डी़ पदवीसाठी प्रवेशपूर्व परीक्षा पास झालेले सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांना आरआरसी (रिसर्च रिकग्नीकेशन कमिटी) कडून विषयाला मंजुरी झाली नाही़ शिवाय प्रवेशाची पात्रता झाली नसताना विद्यापीठाकडून कोर्सवर्कची घाई का केली जात आहे, असा प्रश्न पीएच़ डी़ करणा-या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे़ संशोधन विषयाला मान्यताच नसताना अगोदर कोर्सवर्क हे वरातीमागून घोडे असल्याचा प्रकार विद्यापीठाकडून केला जात असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत आहे़विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नोटीफिकेशन ११ जुलै २००९ पासून जे विद्यार्थी पीएच़ डी़ पदवी संपादन करणार आहेत़ अशा विद्यार्थ्यांना कोर्सवर्क लागू करण्यात आला आहे़ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात यावर्षी पीएच़ डी़ प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आरएसी (रिसर्च अॅलोकेशन कमिटी) घेण्यात आली़ या समितीकडून विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात आले़ प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण व सूट मिमळालेल्या विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शकाकडून १५ दिवसांत बहृत आराखडा तयार करून तो विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात सादर करण्यास सांगण्यात आले़ हा बह्रत आराखडा विद्यापीठाला सादर झाल्यानंतर १५ दिवसांनी आरआरसी ही संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन आराखड्यास मंजुरी देते़ विषयात बदल करणे, विषय पुनर्रावृत्त झाला असेल तर त्यात दुरूस्ती करण्यास सांगितले जाते़ बदल झाल्यास तो बह्रत आराखडा विद्यापीठाला पुन्हा सादर केला जातो़ व विषय मान्यता दिली जाते़ त्यानंतर संशोधक विद्यार्थ्यांना एका महिन्यानंतर विषय मान्यतापत्र दिले जाते़ परंतु स्वारातीम विद्यापीठाने यावर्षी पीएच़ डी़ करणा-या विद्यार्थ्यांचे आरएसी होवून काहीच दिवस झाले असताना व संशोधक मार्गदर्शकाकडून प्रबंधाचा विषयही पूर्ण झाला नसताना कोर्सवर्कची घाई केली़ पीएच़ डी़ ही पदवी पाच वर्षांत पूर्ण करायची असते़ याशिवाय पुढील दोन वर्षे वाढीव मुदतही मिळते़ म्हणजेच सात वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कोर्सवर्कची कधीही पूर्ण करता येते़ परंतु विद्यापीठाने मात्र पीएच़ डी़ करणाºया विद्यार्थ्यांच्या विषयाची अंतिम मंजुरी झाली नाही़ आरआरसी झाली नाही, त्याची पीएच़ डी़ प्रवेशासाठी पात्रताच झाली नाही़ तर कोर्सवर्क कशाच्या आधारावर करायचा, हे नियमाच्या विरोधात असल्याचे संशोधक विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे़
नव्याने पीएच़ डी़ प्रवेश करणा-या विद्यार्थ्यांना अगोदर संशोधनाचा विषय मंजूर व्हावा लागतो़ त्यानंतर त्याचा प्रवेश पात्रता या प्रक्रियेतून जावे लागते़ केवळ रिसर्च अॅलोकेशन कमिटी झाल्यानंतर लगेच कोर्सवर्क व त्याची परीक्षा विद्यापीठाने घेणे नियमबाह्य आहे़- प्रा़ डॉ़ राजपालसिंह चिखलीकर, संशोधक मार्गदर्शक