१ मे २०२१ रोजी गुरुगोविंदसिंघजी यांचे वडील श्री तेग बहाद्दरजी यांची ४०० वी जयंती देशभर साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने नांदेड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम उभारण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. स्टेडियम तसेच शहरातील इतर विकासकामासाठीही आगामी काळात महापालिकेला राज्य शासनाकडून भरीव मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौकट------------
यात्री निवासचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव
कोरोना संकटात नांदेडकरांसाठी उपयुक्त ठरलेल्या यात्री निवासचा मालमत्ता कर पूर्णत: माफ करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रत्येक संकटाच्या काळात जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन तसेच गरजू नागरिकांना गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहीब बोर्ड व गुरुद्वारा लंगर साहिब या दोन सेवाभावी संस्थेची मदत नेहमी होत असते. यामुळे विशेष बाब म्हणून त्यांना अंशत: मदत करण्यासाठी कर माफीचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती सभापती गाडीवाले यांनी दिली.