अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे
By शिवराज बिचेवार | Published: September 7, 2022 06:48 PM2022-09-07T18:48:15+5:302022-09-07T18:48:49+5:30
राहूल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या तयारीसाठी नांदेडात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली.
नांदेड- काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. परंतु त्या अफवा आहेत, एकप्रकारचे षडयंत्र आहे. अशोकराव हे राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत. अशी प्रतिक्रिया काँग्रसचे माणिकराव ठाकरे यांनी दिली.
राहूल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या तयारीसाठी नांदेडात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले, काही मंडळ आणि पक्ष अशोकराव यांच्याबद्दल अफवा पसरवित आहेत. अशोकराव हे प्रामाणिक आहेत. त्यांच्या वडीलांच्या काळापासून चव्हाण घराण्याने काँग्रेस मजबूत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल असा विचार पेरणे, अफवा पसरविणे हे षडयंत्र आहे. या षडयंत्राला कुणी बळी पडू नका असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
आजची बैठकच त्या प्रश्नांना उत्तर
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मात्र या विषयावर फारसे बोलणे टाळले. परंतु त्यांनी आजची भारत जोडो अभियानाची बैठकच त्या सर्व प्रश्नांना उत्तर असल्याची प्रतिक्रिया दिली.