बदलीसाठी २२ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर, २० जुलै रोजी खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी संवर्गनिहाय वास्तव ज्येष्ठता यादी जिल्हास्तरीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. २२ जुलैपर्यंत बदलीसाठी संवर्गनिहाय प्राथमिक, एकत्रित वास्तव्य, सेवाज्येष्ठता याद्या तयार करून जिल्हास्तरीय प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. २२ ते २४ जुलैपर्यंत प्राथमिक वास्तव सेवाज्येष्ठता यादीवर आक्षेप व सूचना मागवल्या जाणार आहेत. २५ जुलै रोजी आक्षेप आणि सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत जिल्हास्तरीय बदली समुपदेशन प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा बदली प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. बदली प्रक्रियेचे सर्व कर्मचारी संघटनांनी स्वागत करताना बदली प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
चौकट--------------------
तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांसाठी २२ जुलैपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १९ जुलै रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी संवर्गनिहाय वास्तव ज्येष्ठता यादी सादर करणे आवश्यक आहे. या वास्तव सेवाज्येष्ठता यादीवर १९ ते २३ जुलैदरम्यान आक्षेपासह सूचना स्वीकारल्या जातील. आक्षेपांचे व सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी २७ जुलै रोजी पार पडेल तर ३१ जुलै रोजी बदली प्रक्रिया समुपदेशनाने पार पाडली जाणार आहे.