शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 7:03 PM

Russia Ukrain war: युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर चर्नीव्हीस्ट येथून २ बसमध्ये जवळपास २०० विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसाठी परवा सायंकाळी निघाले.

- शिवराज बिचेवार

नांदेड: कीव या युक्रेनच्या राजधानीत बसमधून २०० विद्यार्थी पोहोचताच विमानतळवर रशियाने हल्ला केल्याने या विद्यार्थ्यांना मायदेशी परतता आले नाही. यामुळे युक्रेनमधून (Russia Ukrain war) भारतात परतण्यासाठी निघालेल्या जवळपास २०० विद्यार्थ्यांना ४८ तासांपेक्ष जास्त वेळ बसमध्येच प्रवास करावा लागला. या विद्यार्थ्यांमध्ये नांदेडच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (200 students had to travel by bus for three days, but could not return home in India) 

नांदेड येथील संजीवनी वनाळेकर ही मुलगी युक्रेन मधील चर्नीव्हिस्ट मधील बुकोविनियन स्टेट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे. युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर चर्नीव्हीस्ट येथून २ बसमध्ये जवळपास २०० विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसाठी परवा सायंकाळी निघाले. किव विमानतळावरून या विद्यार्थ्यांचे विमान होते. विद्यार्थ्यांच्या बस किवमध्ये पोहोचल्या देखील. पण कीव विमानतळाच्या धावपट्टीवर रशियाने मिसाईल हल्ला केल्याने विमानतळ बंद झाले. 

कीवमध्ये गंभीर परिस्थिती असल्याने हे सर्व विद्यार्थी पुन्हा बसने चर्नीव्हिस्टसाठी निघाले. पण कीव शहर सोडणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने या विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागले. परत चर्नीव्हिस्टला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जवळपास ४८ तास लागले. भारतीय वेळेनुसार पाऊनेपाच वाजेच्या सुमारास हे विद्यार्थी पोहोचले. या विद्यार्थ्यांना आता चर्नीव्हिस्ट वरून रोमानिया या देशात नेले जाणार आहे. त्यानंतर तेथून भारतात आणले जाणार आहे. 

२ दिवसांपासून आपली मुलगी बस मध्ये अडकून पडल्याने संजीवनीचे आई वडील चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणावे अशी मागणी संजीवनीच्या पालकांनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNandedनांदेडStudentविद्यार्थी