जोशी यांना निमंत्रण
नांदेड, येथील सुरमनी धनंजय जोशी यांना मध्यप्रदेश सरकारने ग्वाल्हेर येथील आंतरराष्ट्रीय तानसेन संगीत समारोहात शास्त्रीय गायन सादर करण्यासाठी निमंत्रित केले आहे. जोशी हे सध्या महात्मा गांधी महाविद्यालयात पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
भगवान ढगे यांचे निवेदन
नांदेड, पंचशीलनगर परिसरातील समस्या सोडविण्यात याव्यात तसेच येथील नागरिकांना चांगले रस्ते, नाल्या पथदिवे, पक्की घरे देण्यात यावीत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांनी केली आहे.यावेळी दीपक सातोरे, भीमराव खाडे, राहूल बनसोडे, गणेश पुंडगे, राजू खाडे आदींची उपस्थिती होती.
कराटे बेल्टचे वितरण
नांदेड, जिल्हा मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या ४० विद्याथ्यार्ंना वेगवेगळ्या बेल्टचे वितरण करण्यात आले.संकेत पाटील, सोपान पांडे, भगवान ताटे, साहेब गाडे, त्र्यंबक कदम यांच्या हस्ते सदर बेल्टचे वितरण करण्यात आले. खेळाडूंना प्रशिक्षक एकनाथ पाटील, नफीस शेख, केरबा कंधारे, दिशा चित्तारे, सतीश पटवेकर, प्रतिक्षा थोरात, गोविंद इंगोले यांनी मार्गदर्शन केले.
महिलांचा होणार गौरव
नांदेड, कल्याणी एज्युकेशन, सोशल ॲण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणार्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. बाबा रामदेव रेस्टाॅरंट, महादेव पिंपळगाव फाटा येथे ३ जानेवारी रोजी हा सोहळा होणार असल्याचे संयोजक प्रा.कैलास राठोड यांनी कळविले आहे.
शासनाचा निर्णय घातक
नांदेड, राज्य शासनाने शाळातील शिपाई पद, कारकुनपद रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तो कोरोना काळात घातक असल्याचे मत शिक्षक नेते आर. के.मुधाेळकर यांनी व्यक्त केला आहे. शासनाने स्वच्छतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात अभियान राबविले, त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेत शिपाई व कारकुन पद शासनाने मान्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.