कुंटूर : नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये मौजे, बळेगाव, धनज, मेळगाव, सातेगाव, हुस्सा, राहेर या गावातील शेतीमध्ये अवैध वाळू उपसा करून वाळूचे डोंगर उभारले आहेत. सर्वत्र वाळूचे ढिगारे आहेत पण महसुल यंत्रणा गप्प बसून आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.नायगाव तालुक्यातील राहेर, हुसा, धनज, मेळगाव, बळेगाव, सातेगाव, तसेच मंदीराचा शेजारी, रस्त्याचा बाजुला वाळू साठवणूक ठिकाण बनले आहे. गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी पोकलयानचा साहाय्याने वाळू उपसा चोरी करीत असल्याची चर्चा सुरू आहे. वाळु उपसा संबधी न्यायालयाचा निर्णयाला विरोध करीत आवैध वाळू साठे उभारले आहेत. यावर महसुल यंत्रणा व पोलीस यंत्रणा गप्प का? या वाळू चोरावर कार्यवाही होत नाही आशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. वाळू माफीयांनी पोलीस व महसुल यंत्रणेला हाताशी धरून वाळूचे ढीगारे उभे करून नंतर त्याची विक्री केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना वाळूच्या वाढत्या भावामुळे घरे बांधण्यास वाळू मिळणे कठीण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अमलबजावणी होत नाही. महसुलचे कर्मचारी ते तहसीलदार यांच्यापर्यंत सर्वच टाळाटाळ करीत आहेत. या वर्षीही वाळू उपसा करुन शेतीमध्ये वाळुचे डोंगर उभे करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अवैध साठ्यांचा लीलाव करुन योग्य ती कारवाई करावी. वाळू चोराला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़
नदीकाठच्या शेतात वाळूचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:50 PM
सर्वत्र वाळूचे ढिगारे आहेत पण महसुल यंत्रणा गप्प बसून आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
ठळक मुद्देन्यायालयाचा निर्णयाला विरोध करीत आवैध वाळू साठे उभारले