शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Biyani Murder Case:..अन् ५ सेकंदांतच खेळ खल्लास; 'एसआयटी' घेणार मारेकऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2022 3:57 PM

Sanjay Biyani Murder Case: बिल्डर संजय बियाणी खून प्रकरण : सुपारी देऊन खून केल्याचा पोलिसांचा संशय, घटनास्थळी सापडलेली गोळी विदेशी

नांदेड :   येथील प्रख्यात बिल्डर तथा बांधकाम व्यावसायिक संजय बालाप्रसाद बियाणी (५१, रा. शारदानगर, नांदेड) यांचा मंगळवारी भरदिवसा गाेळ्या झाडून खून केला (Sanjay Biyani Murder Case) असून आरोपींच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना केली आहे. 

बिल्डर संजय बियाणी मंगळवारी सकाळी एका राजकीय नेत्याची भेट घेऊन आपल्या शारदानगर स्थित घरी पाेहाेचले. यावेळी कारमधून उतरत असताना त्या भागात आधीच दबा धरून बसलेले दाेनजण दुचाकी वाहनावरून तेथे आले. त्यांनी बियाणी यांच्या दिशेने बेछूट गाेळीबार केला. छातीत व मानेत गाेळी शिरल्याने बियाणी यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा चालक रवी सुरेश सावंत (३५, रा. राजनगर, नांदेड) हा खांद्यावर गाेळी लागल्याने गंभीर जखमी झाला.  

घटनास्थळी पाेलिसांना एक जिवंत काडतूस आढळले. हे काडतूस विदेशी बनावटीच्या पिस्टलमध्ये वापरले जाते. त्यामुळे मारेकरी स्थानिक नसून बाहेरील असावे, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. बियाणी यांच्या खुनामागे खंडणी, राजकारण, व्यावसायिक स्पर्धा, रियल इस्टेटमधील गुंतवणूक, त्यातील वाद यापैकी एखादे कारण आहे का, की आणखी वेगळ्या कुण्या कारणासाठी हा थरार घडविला गेला, यादृष्टीने पाेलीस तपास करीत आहेत. पाेलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधार्थ पाच पथके गठित केली आहेत. यापूर्वी खंडणी मागणाऱ्या कुख्यात रिंधा टाेळीच्या सदस्यांवरही लक्ष्य केंद्रित केले आहे. शिवाय सध्या कारागृहात असलेल्या इतरही गुंडांची चाैकशी केली जात आहे.  या घटनेनंतर आनंदनगर परिसरात झालेल्या दगडफेकीत एका दुकानाच्या काचा फुटल्या.  मारेकरी दाेन दिसत असले तरी पडद्यामागे आणखी काेण काेण आहेत, सुपारी देऊन तर हा खून केला गेला नाही ना, यादृष्टीनेही पाेलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी विमानतळ पाेलिसांनी अज्ञात दाेन मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नाेंदविला आहे. गाेळीबारानंतर बियाणी यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना मृत घोषित केल्यानं बंधू प्रवीण अन् कुटुंबाने हंबरडा फोडला..

माेठ्या शहरात जाण्याचे स्वप्न राहिले अर्ध्यावरच नांदेडात बांधकाम व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर बियाणी यांनी मागील वर्षीच मोठ्या शहरात जाऊन स्थायिक होण्याचा विचार केला होता. मित्रांसोबतही नेहमी ते नांदेड सोडण्याचा विचार बोलून दाखवित होते. त्याच उद्देशाने त्यांनी पुणे आणि मुंबई येथे काही गुंतवणूक केली होती. परंतु तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे मोठ्या शहरात जाण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

आज ‘नांदेड शहर बदं’चे व्यापाऱ्यांचे आवाहनबियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व व्यापारी संघटनांनी बुधवार, ६ एप्रिल रोजी नांदेड शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बियाणी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. संजय यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता येथे गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

एसआयटीचे नेतृत्व ‘ॲडिशनल’कडेविशेष तपास पथकात नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, लोह्याचे पो. नि. तांबे, लिंबगावचे सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, इतवारा ठाण्याचे गणेश गोठके, हिंगोलीचे गेव्हारे, परभणीचे शिरशेवार आदी आहेत.

कोलंबीवासी आक्रमक, जिल्हाकचेरीत घोषणाबाजीबांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येची माहिती मिळताच कोलंबी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देत आरोपींना २४ तासात अटक करा अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा दिला आहे. यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. .

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, आयजी, एसपी घटनास्थळीपाेलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्याद्वारे मारेकऱ्यांचा काही सुगावा लागताे का, यादृष्टीने शाेध घेतला जात आहे. उपमहानिरीक्षक निसार तांबाेळी, जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे यांनीही ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. घटनेनंतर लगेच शहरात व जिल्हाभर नाकाबंदी करून पाेलीस बंदाेबस्त तैनात केला.

अन् ५ सेकंदांतच खेळ खल्लासबांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपींनी केवळ ५ सेकंदांत १२ राऊंड झाडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संजय बियाणी हे ११.१०.५५ वाजता गाडीच्या उजव्या बाजूने खाली उतरून घराच्या गेटकडे निघाले. तेवढ्यात त्यांच्या मागावर असलेले आरोपी दुचाकीवरून आले. बियाणी यांच्या चारचाकीसमोर दुचाकी उभी करून थेट त्यांच्यावर हल्ला चढविला. हा हल्ला ११ वाजून ११ मिनिटांनी सुरू झाला. आरोपींनी पुढील पाच सेकंद त्यांनी सलग गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी हे जखमी होऊन जमिनीवर कोसळले. तेवढ्यात ११.११.०५ वाजता आरोपी माघारी परतून ११.११.१४ वाजता त्यांनी दुचाकीवरून पळ काढला.  

७७ गरजूंना दिले हक्काचे घरबांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांनी त्यांच्या आईच्या नावे स्व. कांताबाई बियाणी पार्कची उभारणी केली. या पार्कमध्ये माहेश्वरी समाजातील ७७ गरजूंना हक्काचे घरकुल देण्याचे काम त्यांनी आठ दिवसांपूर्वीच केले होते. मोठ्या थाटात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते हा घरकुल प्रदान करण्याचा सोहळा पार पडला होता.कोरोना महामारीच्या काळात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांनी सामाजिक भावनेतून गोरगरिबांच्या घरात चूल पेटविण्याचे काम केले. त्यांनी हजारो गरजूंच्या घरापर्यंत अन्नधान्याच्या किट पोहोचविल्या. 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू