शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज

By शिवराज बिचेवार | Published: August 26, 2024 8:36 AM

मंगळवारी सकाळीं ११ वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  होणार आहेत

नांदेड- नांदेडचे काँगेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हैद्राबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये  निधन झाले. १४ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मृत्यू समयी ते ७० वर्षाचे होते. तब्बल २४ वर्ष सरपंच,एक वेळेस विधानं परिषद सदस्य, दोन वेळेस विधानसभा आमदार ते आता खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. त्यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

१५ ऑगस्ट १९५४ रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाले.1987 साली ते नायगाव चे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर होते. 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये काँग्रेस कडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस ला मरगळ आली होती.

यावेळी काँग्रेसकडून सक्षम चेहऱ्याचा शोध सुरू होता. पक्षाने अखेर वसंतराव याना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. भाजपच्या तोडीची प्रचार यंत्रणा नसताना वसंतराव यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 50 हजारावर मतांनी पराभव केला. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी मिळाली होती. परंतु प्रकृतीच्या कारणाने वसंतराव यांना काही मर्यादा येत होत्या.

त्यातच 13 ऑगस्ट रोजी त्यांना नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याच दिवशी एअर ॲम्बुलन्सने त्यांना हैदराबादला हलविण्यात आले होते. 14 दिवसाच्या उपचारा नंतर त्याचे सोमवारी पहाटे निधन झाले.आज दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिवदेह नायगाव येथे आणले जाणार आहे . मंगळवारी सकाळीं 11 वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  होणार आहेत.

खासदार वंसत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द:- जन्म - 15 ऑगस्ट 1954- 1987 साली नायगाव ग्राम पंचायतीचे सरपंच , 24 वर्ष सरपंच - 1990 - जिल्हा परिषद सदस्य - 2002 विधान परिषद सदस्य ( राष्ट्रवादी ) - 2009 - विधानसभा सदस्य - अपक्ष - 2014 - विधानसभय सदस्य - काँगेस - 2024 - लोकसभा सदस्य - काँगेस

टॅग्स :Nandedनांदेडvasant chavanवसंत चव्हाणcongressकाँग्रेसMember of parliamentखासदार