उद्योजकाचा सत्कार
नांदेड -दुबईचे यशस्वी उद्योजक राजेश बाहेती यांनी दोन दिवसापूर्वी सचखंड गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नानकसाई फाउंडेशनचे पंढरीनाथ बोकारे, सामाजिक कार्यकर्ते बालाजी इबितदार, सुनील कुलकर्णी, सुरेश बोकारे उपस्थित होते.
अपुरे अनुदान
बिलोली - अपुऱ्या अनुदानामुळे ग्रंथालयीन कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने केवळ १०टक्के अनुदान दिले आहे.यासंदर्भात बिलोली तालुका सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या वतीने आ.रावसाहेब अंतापूरकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, ॲड.बाबूराव देशमुख, शिवराज देशमुख, तालुकाध्यक्ष केशवराव वनंजे, सुभाष पाटील, दिगंबर बिलोलीकर उपस्थित होते.
केंद्राच्या धोरणाचा निषेध
बिलोली - केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बिलोली येथे शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख बाबाराव पाटील, व्यंकट गुजरवाड, रमेश देशमुख, जेजेराव पाटील, दिनेश एडके, विजय पाटील, वसंत जाधव, हणमंत पाटील, शंकर कोनेरवाड, दत्ता शिळेकर, रामकिशन भत्ते, अरविंद पेंटे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची तपासणी
नरसीफाटा - नायगाव तालुक्यातील नरसी, गडगा, मरवाळी, मुगाव, खंडगाव आदी ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयात तपासणी करूनच विद्यार्थ्यांना वर्गात पाठविले जात आहे. मरवाळी तांडा येथे सहशिक्षक एस.एस.जाधव, एस.जी. बोईवार, एस.आर.जिंदमवार, सूर्यवंशी, ए.ए. शेख, एस.बी. परसुरे, एस.बी.देशमुख, व्ही.जी.रेकुलवाड आदी विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत.
मुंडे यांना अभिवादन
नांदेड - खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील संपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रवीण साले, संतुक हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, मिलिंद देशमुख, संजय घोगरे, प्रवीण पाटील, ॲड.दिलीप ठाकूर, बंडू पावडे, आनंदराव पाटील, विजय गंभीरे, बालाजी पाटील, मोतीराम वाघ, सुहास पाटील आदी उपस्थित होते.
धर्माबादेत जयंती
धर्माबाद - गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त धर्माबादेत अभिवादन करण्यात आले. यावेळी मोगला गौड, साईनाथ शिरपुरे, सतीश मोटकुल, संजय पवार, मुरली गौड, रामेश्वर गंदलवाड, सज्जन गडोड, अमित मुंदडा, गिरीधर बुंदले, चेतन घाटे, प्रवीण बेलूरकर आदी उपस्थित होते.
विष्णू सावरा यांना श्रद्धांजली
किनवट - आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांना आ.भीमराव केराम यांच्या संपर्क कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आ.केराम, गोवर्धन मुंडे, श्रीनिवास नेम्मानीवार, अशोक जाधव, शेखर चिंचोलकर, बबलू नाईक, तुळशीराम गेडाम, प्रकाश नगराळे, माधव किरवले, मारोती आडे, प्रकाश कुडमथे, नीळकंठ कातले, संतोष मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.
लोह्यात केंद्राचा निषेध
लोहा - केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत याशिवाय राज्यमंत्री दानवे यांनी माफी मागावी आदी मागण्यांसाठी लोह्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील ढाले, मिलिंद पाटील, स्वप्नील पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव शिंदे, साहेबराव हरगावकर, अमर शेख आदी उपस्थित होते.