अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे होते विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य जोतिबा खराटे, बालाजी मुरकुटे पाटील,माजी नगराध्यक्ष साजिद खान ,प्रा डॉ पंजाब शेरे,मारूती भरकड, दत्ता आडे, संगीता पाटील, संतोष मरसकोल्हे, वाडगुरे,राजकुमार बाविस्कर,पांडुरंग गुरनुले,संदीप पेटकुले, संजय गुरनुले,राजू पेटकुले आदींची उपस्थिती होती.
यावेळी युवा व्याख्याते अतुलराज बेळीकर बोलताना म्हणाले की, जिच्या हातात पाळण्याची दोरी होती , चूल आणि मुल पुरती मर्यादित असलेल्या हातात आज क्रांतीची पेन देऊन विद्रोहाचा एल्गार करणाऱ्या स्त्री मुक्तीच्या आद्यप्रवर्तक ह्या क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले होतात... आ.भीमराव केराम तसेच ज्योतिबा खराटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक संथागार वृद्धाश्रमाचे संचालक अरुण आळणे यांनी केले. सूत्रसंचालन अधीक्षिका आकांक्षा आळणे ह्यांनी केले तर आभार राजेश पाटील यांनी मानले.
कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, माजी नगरसेविका करुणा आळणे , अजिंक्य आळणे यांनी परिश्रम घेतले .