शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

गेन बिटक्वाईनमध्ये नांदेडात अनेकांची फसवणूक; शहरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:58 IST

नांदेडातील एका डाॅक्टरने तर तब्बल ५० लाख रुपयांचे बिटक्वाईन भारद्वाजला दिले होते.

नांदेड :नांदेडातील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी २०१७ मध्ये आपल्या जवळील बिटक्वाईन सॉफ्टवेअरवर प्रति महिना १० टक्के व्याजदर मिळण्याच्या आमिषाने गेन बिटक्वाईन दिले होते. सुरुवातीला काही महिने गेन बिटक्वाईनने आकर्षक व्याजदरही दिले. नंतर मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यात नांदेडातून जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे. त्यात आता सीबीआयकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे.

२०१७ मध्ये या प्रकरणात नांदेडात पहिला गुन्हा दाखल झाला होता. गेन बिटक्वाईनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज हा या प्रकरणात आरोपी होता. भारद्वाज याने नांदेडात शिक्षण घेतले होते. या ओळखीचा फायदा उचलत त्याने आपल्या गेन बिटक्वाईन या डिजीटल चलनात गुंतवणूक करण्यासाठी अनेकांना आमिष दाखविले. त्यानंतर नांदेडातील अनेकांनी भारद्वाज याच्यासोबत करार करुन आपले बिट क्वाईन साॅफ्टवेअर गेन बिटक्वाईन या कंपनीला दिले. त्या बदल्यात भारद्वारज हा दर महिन्याला गुंतवणूकदारांना १० टक्के व्याज देणार होता. सुरुवातीचे काही महिने भारद्वाजने नियमितपणे गुंतवणूकदारांना व्याज दिले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेऊन नांदेडातील अनेकांनी गेन बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक केली.  परंतू त्यानंतर भारद्वाजने या मंडळींची फसवणूक केली. त्यानंतर तो थेट दुबईत पळाला होता. याचदरम्यान भारद्वाज याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. त्यातच देशात आल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.  

नांदेड पोलिसांनीही त्याचा ताबा मिळविला होता. त्यानंतर नांदेडच्या तुरुंगातही काही काळ घालविला. मध्यंतरी भारद्वाज याचा मृत्यू झाल्याने सर्व गुंतवणूकदार धास्तावले होते. आता या प्रकरणात सीबीआयकडून देशातील ६० ठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. त्यात नांदेडचाही समावेश आहे. 

नांदेडातच घेतले भारद्वाजने शिक्षणअमित भारद्वाज हा नांदेडातील एमजीएम महाविद्यालयात शिक्षणासाठी होता. त्यामुळे नांदेडातील अनेकांच्या तो संपर्कात होता. त्याने गेन बिटक्वाईन कंपनी सुरु केल्यानंतर नांदेडातील अनेक जणांनी त्याच्या विश्वास ठेऊन गुंतवणूक केली होती. त्यात नांदेडातील एका डाॅक्टरने तर तब्बल ५० लाख रुपयांचे बिटक्वाईन भारद्वाजला दिले होते.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीBitcoinबिटकॉइन