आरळी: बिलोली तालुक्यातील आरळी येथील श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी पूजा शेषराव इबतेवार हिचा २९ एप्रिल रोजी सायंकाळी सर्पदंशाने मृत्यू झाला.पूजा राहत्या घरी सायंकाळी कुटुंबासोबत जेवण घेतल्यानंतर रात्री आई व ताईच्या शेजारी झोपली होती. अचानकपणे सापाने तिच्या पायास दंश केला. पूजा व सर्व कुटुंबिय झोपेत असल्याने कोणालाच सर्पदंशाची घटना लक्षात आली नाही. रात्री सव्वा नऊ वाजता पूजाने आईस पाय जड पडत चालल्याचे सांगितले. पाय चेपताना आईच्या हातास रक्त लागले व सर्पदंशाची खूण दिसल्याने आईने हंबरडा फोडला. लगेच कुंटुबीय व शेजारील व्यक्तीनी तिला जवळच असलेल्या बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तिच्या पश्चात आई, मोठी बहीण, भाऊ व आजोबा असा परिवार आहे. पाच वर्षांपूर्वी गरीब परिस्थितीला कंटाळून वडील शेषराव इबतेवार यांनी आत्महत्या केली.आई व तिचे तिचे आजोबा मोलमजुरी करुन कसाबसा संसाराचा गाडा चालवताना नियतीने पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबीयावर घाला घातला.
आरळीत सर्पदंशाने शाळकरी मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:46 PM