नांदेड : सर्व शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान शासनाने सुरू केले आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील शाळांना लाखो रुपयांचे बक्षिस मिळणार असून, यात कोणत्या शाळा सरस ठरणार ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सदर अभियान १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.सरळ पोर्टलवरील स्टुडंट पोर्टल ही न्यू टॅब दिली असून, यावर जिल्ह्यातील सर्वच १९९९ शाळांची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.आतापर्यंत एकूण ९११ शाळांनी आपली माहिती १०० टक्के केली आहे. माहिती भरलेल्या शाळांचे ५ जानेवारीपासून सुंदर माझी शाळा केंद्रस्तरीय मूल्यांकन सुरू आहे. या अभियानात विजेत्या ठरलेल्या शाळांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
तालुक्यातून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणा-या शाळांना बक्षिसांची रक्कम अनुक्रमे ३ लाख रुपये २ लाख रुपये, १ लाख रुपये आहे.जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक १२ लाख रुपये, द्वितीय ५ लाख रुपये आणि तृतीय क्रमाांक प्राप्त करणा-या शाळांना ३ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.सदर स्पर्धा खासगी अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांचा एक गट व खाजगी अनुदानित शाळांचा एक गट अशी विभागणी केली आहे. यासाठी स्वतंत्र बक्षिसांची घोषणा केली आहे. याशिवाय विभागस्तरावर प्रथम बक्षीस २२ लाख रुपये,द्वितीय ११ लाख रुपये आणि तृतीय बक्षीस ७ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. शाळा, विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा व इतर माध्यमांच्या शाळांसाठी ही स्पर्धा खुली आहे. शाळांना पोर्टलवर माहिती भरण्याची अंतिम मुदत १७ फेब्रुवारी २०२४ आहे. त्याअनुषंगाने शाळांची लगबग सुरू आहे.
असे आहेत निकषनिर्धारित गुण शाळांचे मूल्यांकन सुरू झाले असून,विद्यार्थिकेंदित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यावर एकूण ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यावर एकूण ४० गुण अशा १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे.
या घटकांचा अंतर्भाव संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता,चांगले आरोग्य राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास अशा अनेक विविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सरळ पोर्टलवरील स्टुडंट पोर्टल ही न्यू टॅब दिली आहे.त्यावर सर्व शाळांनी आपापल्या शाळांची माहिती भरणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.