लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : गडावरील जगप्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी रात्री १२़३२ वाजता घडली़ दरम्यान, सुरक्षारक्षक व बिबट्यामध्ये जाळी असल्याने सुदैवाने सुरक्षारक्षक बचावला़पाण्याच्या शोधात जंगली प्राणी गाववस्त्यांत येत असून पाळीव प्राणी, शेतातील उभ्या पिकांच्या नुकसानीच्या बऱ्याच तक्रारी होत असून तीन दिवसांआधी शासकीय विश्रामगृहामागील ऩप़च्या पाणीपुरवठा विभाग परिसरात अस्वलाने धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे़१७ एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजता अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने सुरक्षारक्षक दीपक जगदाळे पाहत उभे राहिले असता दोन कुत्रे त्यांच्या दिशेने धावत आले व त्यांच्यामागे अचानक बिबट्या धावत येत असल्याचे दिसल्याने जगदाळे यांनी मंदिराच्या मागील बाजूस पळ काढला़ जाळीमध्ये आल्याने एक कुत्रा यांच्यासोबत पळाला व एक कुत्रा जाळीतून निघू न शकल्याने बिबट्याने त्याची मान पकडून त्यास ओढत जंगलात नेले़यामुळे सुरक्षारक्षक जगदाळे यांना घाम फुटला़ त्यांनी आवाज देवून मंदिरातील इतर सुरक्षारक्षकांना बोलावले व जोरजोरात ओरडल्याने बिबट्या मातृतीर्थ तलावाकडील जंगल भागात पळून गेला़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली़सदरील घटनेबाबत संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेस दुजोरा दिला असून सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक वाढवून उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले़
माहूरगडावर बिबट्याचा धुमाकूळलोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : गडावरील जगप्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी रात्री १२़३२ वाजता घडली़ दरम्यान, सुरक्षारक्षक व बिबट्यामध्ये जाळी असल्याने सुदैवाने सुरक्षारक्षक बचावला़पाण्याच्या शोधात जंगली प्राणी गाववस्त्यांत येत असून पाळीव प्राणी, शेतातील उभ्या पिकांच्या नुकसानीच्या बऱ्याच तक्रारी होत असून तीन दिवसांआधी शासकीय विश्रामगृहामागील ऩप़च्या पाणीपुरवठा विभाग परिसरात अस्वलाने धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे़१७ एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजता अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने सुरक्षारक्षक दीपक जगदाळे पाहत उभे राहिले असता दोन कुत्रे त्यांच्या दिशेने धावत आले व त्यांच्यामागे अचानक बिबट्या धावत येत असल्याचे दिसल्याने जगदाळे यांनी मंदिराच्या मागील बाजूस पळ काढला़ जाळीमध्ये आल्याने एक कुत्रा यांच्यासोबत पळाला व एक कुत्रा जाळीतून निघू न शकल्याने बिबट्याने त्याची मान पकडून त्यास ओढत जंगलात नेले़यामुळे सुरक्षारक्षक जगदाळे यांना घाम फुटला़ त्यांनी आवाज देवून मंदिरातील इतर सुरक्षारक्षकांना बोलावले व जोरजोरात ओरडल्याने बिबट्या मातृतीर्थ तलावाकडील जंगल भागात पळून गेला़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली़सदरील घटनेबाबत संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेस दुजोरा दिला असून सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक वाढवून उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले़