शिवराज बीच्चेवार/
नांदेड- "जागा वाटपाची सुरुवात अजून झालेली नाही. महाविकास आघाडीचे सगळे नेते सध्या दौऱ्यावर आहेत. 16 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा आहे, त्यावेळी आम्ही जागा वाटपाच्या संदर्भातल्या बैठकीची तारीख निश्चित करू. मिरच्या आधारावर जागावाटप होईल. आमचा एकच उद्देश, महा भ्रष्ट आणि मतिमंद सरकार आम्हाला घालवायचा आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.
राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यादरम्यान जे घडलं त्यामागे उद्धव ठाकरे शरद पवार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. या आरोपावर नाना पटेल यांनी मात्र कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, "राज्यात कायदा सुव्यवस्था आणि नीतिमत्ता राहिली नाही. राज्यातले सरकार खोक्याचे सरकार आहे, बेईमान सरकार आहे, गुजरात धार्जिन सरकार आहे. सरकारमुळे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. एखाद्या पक्षाच्या नेत्यावर कसा हमला केला जातो, हे आपण पाहिलेला आहे आणि तो पण ठाण्यामध्ये जिथे राज्याचे मुख्यमंत्री राहतात. ठाणे जिल्ह्यात अशी कृती होत असेल, तर ती अशोभनीय आहे. कुणी त्या कृतीचा समर्थन करू शकत नाही", असेही नाना पटोले म्हणाले.
नांदेडमधील देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर सध्या भाजप नेत्यांसोबत संपर्कात आहेत. याबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले, "राज्यसभा विधानसभेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केली, त्यांची नावे आपल्याला तिकीट वाटपात कळतील. कोणालाही जबरदस्ती नाही, काँग्रेसमुळे ते आमदार झालेत , काँग्रेस विरोधात जायचे असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देगलूरमध्ये लोक काँग्रेसच्या विचाराचे आहेत. कारवाई बाबत निर्णय ठरलेले आहेत, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल," अशी प्रतिक्रिया नाना पटेल यांनी दिली.
तसेच, "परमजीत सिंग अधिकारी आहे, त्यांना भगोडा जाहीर केले होते. चांदीवली आयोगाच्या समक्ष त्यांनी जे आरोप लावले होते ते सर्व आरोप त्यांनी परत घेतले होते. चांदीवली आयोगासमोर परमबीर सिंग बोलू शकले नाही, आता सरकारी पक्षाचे पोपट झाले आहेत. सरकार मूळ प्रश्नाकडे लक्ष देत नाही, परमबीर सिंग पोपट बनत असेल त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका", असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.