बसमध्ये कधी प्रवास करण्याचा योग आला नाही. परंतु, गरज पडली तेव्हा नक्कीच प्रवास करू. मतदारसंघातील दौरे, कामे यामध्ये बसने प्रवास करायला कुठे वेळ मिळणार आणि कधी तशी गरज पडली नाही. स्वत:च्या वाहनानेच फिरतो. - मोहनराव हंबर्डे, आमदार
बसचे तिकीट काढून बसने प्रवास केला आहे; परंतु, मोफत प्रवासाचा कधी योग आला नाही. आजही शहरात दररोज सकाळी स्कुटीवर चक्कर मारून नागरिकांच्या समस्या जाणून घेतो. बाहेर फिरण्यासाठी इनोव्हा वापरतो.
- बालाजीराव कल्याणकर, आमदार
शासनाकडून आमदारांना बसमध्ये मोफत प्रवासाची मुभा दिलेली आहे; परंतु बसमध्ये प्रवास करण्याचा तसा योग आला नाही. दिवसभरातील कार्यक्रम, दौरे आणि जनतेच्या कामासाठी खासगी वाहनातूनच फिरत असतो.
- अमरनाथ राजूरकर, आमदार
चारचाकीत फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत?
आमदार होण्यापूर्वीच प्रत्येक नेत्याकडे स्वत:च्या मालकीच्या २० ते २५ लाखांच्या महागड्या गाड्या असतात. त्यांना एसटीच्या प्रवासाची काय गरज पडणार? त्यामुळे विनाकारण सीट आरक्षित करून ठेवणे चुकीचेच आहे. आरक्षण सीट रद्द करावे.
- गजानन पाटील
अपंग, ज्येष्ठांसाठी सीट राखीव असणे, त्यावर तसा उल्लेख असणे गरजेचे आहे. परंतु, आमदार यांच्या नावे राखीव असलेल्या सीटवर बसून कधी कोणत्या आमदाराने प्रवास केल्याचे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे सीटचे आरक्षण केवळ नावालाच असते, असे वाटते.
- श्रीकांत रहाटकर