शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

हरयाणात काँग्रेस नेत्यांची दुसरी पिढी निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:55 AM

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाने यावेळी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची दुसरी पिढी उतरवली आहे.

- बलवंत तक्षकहरयाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाने यावेळी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची दुसरी पिढी उतरवली आहे.विधानसभेचे माजी अध्यक्ष हरमहेंद्र सिंह चढ्ढा यांचे चिरंजीव मनदीप सिंह चढ्ढा यांना कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा मतदारसंघातून तिकीट दिले गेले आहे. प्रदेश काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले माजी मंत्री फुलचंद मुलाना यांच्या मतदारसंघात त्यांचे चिरंजीव वरुण चौधरी यांना संधी मिळाली आहे. रेवाडी मतदारसंघातून माजी मंत्री कॅप्टन अजय सिंह यादव यांचे चिरंजीव राव यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. माजी मंत्री महेंद्र प्रताप सिंह यांचे चिरंजीव विजय प्रताप सिंह यांना फरिदाबाद जिल्ह्यातील बडखल मतदारसंघातून उतरवले गेले आहे. अनेक निवडणुका पराभूत झालेले डॉ. के. व्ही. सिंह यांच्या जागी यावेळी डबवाली मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव अमित सिहाग यांना तिकीट दिले गेले आहे. माजी मंत्री दिवंगत शिवचरणलाल शर्मा यांचे चिरंजीव नीरज शर्मा यांना फरिदाबाद एनआयटी, माजी मंत्री ब्रजमोहन सिंगला यांचे चिरंजीव अंशुल सिंगला यांना जिंद आणि माजी आमदार मनीराम केहरवाला यांचे नातू शीशपाल केहरवाला यांना कालांवाली मतदारसंघातून संधी मिळाली आहे.केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांची कन्या आरती राव यांना भाजपने रेवाडी मतदारसंघातून तिकीट दिले नाही; परंतु काँग्रेसने त्यांचा धाकटा भाऊ राव यदुवेंद्र सिंह यांना कोसली आणि दुसरा भाऊ अजित सिंह यांचे चिरंजीव राव अर्जुन सिंह यांना अटेली मतदारसंघातून तिकीट दिले आहे. यदुवेंद्र सिंह काँग्रेसच्या तिकिटावर पूर्वी आमदार होतेच, तर अर्जुन सिंह प्रथमच निवडणूक लढवत आहेत.भाजपकडून ‘टिक-टॉक’ स्टार मैदानातहरयाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने ‘टिक-टॉक’ स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली फोगाट यांना उमेदवारी दिली आहे. टिक-टॉकवर रोजच्या रोज स्वत:चे व्हिडिओ टाकणाºया सोनाली फोगाट यांचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या जोरावर आपण निवडून येऊ, असा दावा त्यांनी केला आहे.आदमपूरमधून कुलदीप बिष्णोई हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते तिथून तीन वेळा विजयी झाले आहेत. त्यांचे वडील भजनलाल हे हरयाणाचे तीनदा मुख्यमंत्री होते आणि ते तिथूनच निवडून येत. टिक-टॉक स्टारला उभे करून भाजपने तरुणांची मते खेचून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019