नांदेड : लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध व भेसळयुक्त दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ११ ते १९ मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ३४ हजार ३८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने होळी सण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री तसेच भेसळयुक्त दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने आठवडाभरापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे़ ११ ते १९ मार्च या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जवळपास ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये तेलंगणा राज्यातून येणाऱ्या विदेशी दारूचे दोन बॉक्स पकडण्यात आले़ त्याचबरोबर वेगवेगळ्या कारवायांमध्ये हातभट्टीची ८१ लिटर, रसायनमिश्रीत २ हजार ७७३ लिटर, देशी ७०० लिटर, ताडी ९४८ लिटर त्याचबरोबर विदेशी राज्यांतर्गत २ लिटर दारू जप्त करण्यात आली़ या कारवाईमध्ये ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ त्याचबरोबर एक चारचाकी आणि चार दुचाकी अशी पाच वाहने जप्त केली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेल्या ५६ गुन्ह्यांपैकी १५ गुन्हे अज्ञात आरोपींविरोधात दाखल करण्यात आले आहेत़ या सर्व मोहिमेंतर्गत जवळपास ९ लाख ३४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी़एऩचिलवंतकर, एस़एस़ खंडेराय, बोधमवाड, पी़ए़मुळे, पोलीस उपनिरीक्षक पठाण, मंडलवार, लोळे, टकले आदींनी केली़शिवाजीनगरमध्ये ५५ हजारांची दारु जप्तमंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहिती आधारे टाकलेल्या धाडीत एका व्हॅनमध्ये ५५ हजार ३९० रुपयांची अवैध दारु आढळून आली. ही दारु बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या हेतूने नेण्यात येत होती. या प्रकरणी पोलीस हे. कॉ. तेलंगे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजीनगर हद्दीत कोम्बिंग आॅपरेशन करुन पोलिसांनी दोघांना अटक केली.
साडेनऊ लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:30 AM
लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध व भेसळयुक्त दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ११ ते १९ मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ३४ हजार ३८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़
ठळक मुद्दे५६ गुन्हे दाखल : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई