शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

खळबळजनक!'आपला संकल्प, विकसित भारत' यात्रेतील लाखों रुपयांचे साहित्य उकिरड्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:39 AM

जनतेच्या पैशांचा अपव्यव कसा होतो याचे उत्तम उदाहरण यातून दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.

- मारोती चिलपिपरेकंधार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या विकसित भारत, संकल्प यात्रेचे लाखों रुपयांचे साहित्य उकिरड्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. समोवारी सायंकाळी कंधार-घोडज रस्त्यावर या संकल्प यात्रेतील लाखो रुपयांचे साहित्य एका उकिरड्यावर फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या या साहित्याचे गठ्ठे थेट उकिरड्यावर दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

कंधार तालुक्यात अनेक दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सरकारने केलेल्या कामाची माहिती देत ग्रामस्थांना रथातून चित्रफित दाखविण्यात येते. काही गावात या रथ यात्रेला मराठा आरक्षणामुळे विरोधही झाल्याचे पहावयास मिळाला होता. मात्र, अनेक गावांमध्ये यात्रा यशस्वी पार पडली आहे.

दरम्यान, या शासकीय यात्रेतील माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके, कॅलेंडर, बॅनर आदी लाखो रुपयांचे  साहित्य सोमवारी सायंकाळी कंधार ते घोडज रस्त्यावर नागरी वस्तीच्या बाजूला चक्क उकिरड्यावर आढळून आले.यातील काही साहित्य जाळून टाकण्यात आले होते. ग्रामस्थांना न वाटताच हे साहित्य उकिरड्यावर फेकून दिल्याने खळबळ उडाली आहे.अनेकांनी यातील कॅलेंडर व इतर साहित्याचे गठ्ठे उचलूनही नेले. जनतेच्या पैशांचा अपव्यव कसा होतो याचे उत्तम उदाहरण यातून दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडCentral Governmentकेंद्र सरकार