शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोलीस आयुक्तालय व ग्रामीणची सेवा एकत्र मोजता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:13 AM

नितीन वसंत ठाकरे या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने ॲड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. ठाकरे हे ठाणे पोलीस ...

नितीन वसंत ठाकरे या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने ॲड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. ठाकरे हे ठाणे पोलीस आयुक्तालयात क्राईम ब्रँच युनिट १ मध्ये कार्यरत होते. तेथे ते २० जून २०१५ ला रुजू झाले. तेथून त्यांची ४ मे २०२० रोजी नंदूरबार येथे जिल्हा जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली. एका आयुक्तालयात सहा वर्षे सेवेचा निकष आहे. परंतु ठाकरे यांना तेथे ५ वर्षे १० महिने झाल्याने ते बदलीस पात्र नव्हते. मॅटमध्ये ठाणे पोलीस आयुक्त व सध्याच्या पोलीस महासंचालकांना प्रतिवादी बनविण्यात आले. तेथे शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी क्रांती गायकवाड यांनी ठाकरे यांची फौजदार ते निरीक्षक अशी सुमारे १३ ते १६ वर्षांची सेवा ठाणे जिल्ह्यातच झाल्याचे सांगितले. ते ठाणे ग्रामीणमध्ये कार्यरत होते. परंतु मॅटने सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. ठाणे ग्रामीण पोलीस दल व ठाणे पोलीस आयुक्तालय हे वेगवेगळे आहेत. ठाकरे निरीक्षक म्हणून जरी या दोन ठिकाणी सेवारत असते, तरी त्यांची सेवा एकत्र ग्राह्य धरता आली नसती, असे मॅटने स्पष्ट केले. ठाकरे यांच्या बदलीचा ४ मे २०२० चा आदेश मॅटने रद्द केला असून, त्यांना दोन आठवड्यांत पूर्वपदावर ठाणे क्राईम ब्रँचमध्ये नियुक्ती देण्याचे आदेश जारी केले. विशेष असे शासनाने या निर्णयाला मागितलेल्या स्थगनादेशही मॅटने नाकारला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. भूषण बांदिवडेकर व ॲड. गायत्री गौरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

चौकट ........

मॅटचे पोलिसांच्या कारभारावर गंभीर ताशेरे

- पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या बदली प्रकरणात मॅटने प्रतिवादी तथा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर गंभीर स्वरुपाचे ताशेरे ओढले आहेत.

- ठाकरे पात्र नसताना त्यांच्या बदलीचा जारी झालेला आदेश म्हणजे पोलीस कायद्याच्या तरतुदीला धडधडीत छेद देणारा आहे. असा आदेश कोणतेही न्यायालय ग्राह्य धरणार नाही.

- ठाकरे यांचे बदली प्रकरण बेजबाबदारपणे हाताळले गेले. कागदपत्रे वाचून, अभ्यास करून मत तयार केले गेले नाही.

- पात्र नसताना बदली केल्याची चूक लक्षात आल्यानंतर ती दडपण्यासाठी त्यांची ठाणे जिल्ह्यात १३ ते १६ वर्षे सलग सेवा झाल्याचा बचाव घेण्यात आला. परंतु हा बचाव कायद्याच्या विरोधातील आहे.

- चुकीच्या पद्धतीने बदलीमुळे आधीच ठाकरे यांची केस डॅमेज झाली होती. ती दुरुस्त करण्याऐवजी शपथपत्रामध्ये चुकीचा बचाव घेऊन केस आणखीन डॅमेज करण्यात आली.

-या प्रकरणात घेतलेला बचाव हा रेकॉर्डवरील मुद्द्यांना क्रॉस करणारा आहे. त्यात पश्चातबुद्धी दिसून येते.

- विभागीय समितीच्या बैठकीत बदलीच्या मंजूर प्रकरणांना अतिरिक्त गृह सचिवांची मंजुरी आवश्यक आहे. किमान बैठकीनंतर तरी त्यांच्याकडे फाईल पाठवून ती घेणे अपेक्षित होते.

- डीपीसीचे सदस्य स्वाक्षरी करताना त्याखाली तारीख लिहित नाहीत. त्यामुळे स्वाक्षरी नेमकी केव्हा केली, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे स्पष्ट करून मॅटने या कारभारावर तीव्र नाराजी नोंदविली.