नांदेड : किनवट तालुक्यातील २१ पैकी पाच प्रकल्पांतील जलसाठा हा मृत अवस्थेत असून हे पाच प्रकल्प कोरड्या अवस्थेत आहेत़ उर्वरित प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा असल्याने मे अखेर या प्रकल्पाची काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़
आजघडीला असलेला प्रकल्पातील जलसाठा याप्रमाणे- नागझरी-५७़५८, लोणी-२३़३३, डोंगरगाव-८१़७३, मुळझरा-१३़५८, थारा-८९़९३, जलधरा-८४़४८, हुडी-२०़७५, पिंपळगाव (कि़)-१७़२१, सिंदगी (बोधडी)-७४़००, लक्कडकोट-१०़५६, निराळा-२४़२० टक्केच असल्याने ऐन उन्हाळ्यात प्रकल्पाखालील गावांत पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे़
प्रकल्पाची ही परिस्थिती पाहता तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम प्रशासनाने शेतकर्यांवर कोणताही बोजा न टाकता हाती घ्यावा़ गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत़ गाळात रुतलेले प्रकल्प गाळमुक्त झाल्यास पाणीसाठा वाढून तसेच गाळ शेतात पडल्यास शेतकरी सुजलाम्-सुफलाम् होण्यास मदत होईल, नव्हे उत्पन्नात वाढ होईल.
किनवट तालुक्यात नागझरी, लोणी, डोंगरगाव मध्यम प्रकल्प आहेत़ उर्वरित १८ प्रकल्प हे लघू व बृहत आहेत़ १ हजार २४० मि़मी़ इतकी वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी असलेल्या तालुक्यात केवळ ४६ टक्केच्या आतच पाऊस पडल्याने व तोही कधी भीज तर कधी रिमझीम़ मोठा पाऊस पडलाच नसल्याने प्रकल्प भरलेच नाहीत़ जे भरले त्यात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने जानेवारीत अंबाडी-नंदगाव, वरसांगवी, सिरपूर, मांडवी हे पाच प्रकल्प कोरड्या स्थितीत म्हणजे मृतसाठा असलेली आहेत़ निचपूर-०़७२, कुपटी-२़८५, सिंदगी-५़८३, पिंपळगाव मि़-२़२५ व सावरगाव २़४८ अशा एक अंकीच टक्के जलसाठा असल्याने तीही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत़