लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नगरीची सांस्कृतिक ओळख असणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाला रविवार, २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या महोत्सवात दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार असून, महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य व देखणा व्हावा यासाठी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आ.डी.पी.सावंत, कोषाध्यक्ष गंगाधरराव शक्करवार व सहसचिव उदयराव निंबाळकर हे तयारीवर लक्ष ठेवून आहेत.महोत्सवासाठी शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात अत्याधुनिक असे ५ फूट उंच व २० बाय ४० फूट रुंदीचे भव्य व्यासपीठ असणार आहे. पाऊस व गारपिटीपासून सुरक्षित राहील असा वॉटरप्रूफ ८० बाय २५० फुटांचा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. एकाच वेळी ५००० पेक्षा जास्त प्रेक्षक या मंडपात संगीताचा आनंद घेऊ शकतील. सुमधुर अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था आहे. शेवटच्या रसिकांना व्यासपीठावरील बारकावे नीट पाहता यावेत यासाठी थेट प्रक्षेपणासाठी व्यासपीठावर मध्यभागी एक व व्यासपीठाच्या दोन्ही बाजूने दोन मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. त्यावर आतापर्यंत झालेल्या महोत्सवाचा सांगीतिक आढावा छायाचित्रकार होकर्णे सादर करणार आहेत. व्यासपीठासमोरची शोभा वाढाविण्यासाठी रांगोळी कलावंत श्रीरंग खानजोडे हे मेहनत घेत आहेत.महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आ. डी . पी . सावंत यांनी समिती गठीत केली असून त्यामध्ये अपर्णा नेरळकर , ऋषिकेश नेरळकर , रत्नाकर आपस्तंब, संजय जोशी, प्राचार्य ए. एन. जाधव, प्रा. डॉ. जगदीश देशमुख, गिरीश देशमुख, विजय होकर्णे, गोविंद पुराणिक, डॉ. प्रमोद देशपांडे व मंजुषा देशपांडे यांचा समावेश आहे.या महोत्सवातील सकाळ व दुपारचे कार्यक्रम कुसुम सभागृहात असून सायंकाळचे कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात असणा-या मुख्य मंचावर होतील, अशी माहितीही शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात आली.शंकर दरबारचे यंदा चौदावे वर्षनांदेड येथील या महोत्सवाची भारतातील मोठ्या संगीत महोत्सवात गणना होते. या महोत्सवामुळेच नांदेड शहराला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्री असा यशस्वी प्रवास करणारे व मराठवाड्याचे भगीरथ म्हणून ओळखले जाणारे डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे शास्त्रीय संगीतावरील असणारे प्रेम सर्वश्रुत आहे. शास्त्रीय संगीतावर बोलताना कै. डॉ. शंकरराव चव्हाण असे म्हटले होते की, प्रथम राजाने आणि नंतर देशाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किंबहुना ती यशस्वी करण्यासाठी मला या शास्त्रीय संगीताकडून खूप शिकता आले. त्यामुळेच शास्त्रीय संगीताचा मी कायम ऋणी आहे. आणि यामुळेच त्यांनी स्थापन केलेल्या शारदा भवन एज्युकेशन सोसायटीतर्फे कै. डॉ . शंकरराव चव्हाण स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी अभिजात संगीताचा हा 'संगीत शंकर दरबार' आयोजित करण्यात येतो.दिग्गज कलाकारांची परंपरा यंदाही कायमसंगीत शंकर दरबारचे यंदा १४ वे वर्ष आहे. या दरबारने राष्टÑीय तसेच आंतरराष्टÑीय पातळीवर नाव असलेल्या अनेक दिग्गज कलाकारांना नांदेडमध्ये आणले आहे. यंदाही ही परंपरा कायम आहे. शुभा मुद्गल यांच्या शास्त्रीय गायनाची मेजवाणी यानिमित्ताने नांदेडकरांना अनुभवता येणार आहे. याबरोबरच दरबारच्या पहिल्याच दिवशी उषा मंगेशकर संगीतरजनीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. पं. उद्धवबापू आपेगावकर, नेदरलँड येथील प्रसिद्ध सतारवादक बर्ट कार्नोलिस यांच्यासह शशी व्यास, आयान खाँ व अमान खाँ यांचे सरोदवादन तर पं. गणपती भट धारवाड यांच्या शास्त्रीय गायनाचीही मेजवाणी मिळणार आहे.
नांदेड नगरीत रविवारपासून रंगणार ‘शंकर दरबार’ महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:44 AM
नगरीची सांस्कृतिक ओळख असणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाला रविवार, २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या महोत्सवात दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार असून, महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य व देखणा व्हावा यासाठी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आ.डी.पी.सावंत, कोषाध्यक्ष गंगाधरराव शक्करवार व सहसचिव उदयराव निंबाळकर हे तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
ठळक मुद्दे अत्याधुनिक यंत्रणा : महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात