शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 04:26 PM2023-07-02T16:26:46+5:302023-07-02T16:31:39+5:30
सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप.
नांदेड : राज्यातील सरकारकडे स्पष्ट बहुमत असतानाही फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. याचा अर्थच राज्यातील सध्याचे सरकार स्थिर नाही. त्यामुळे इतर पक्षांतील लोकांना फोडाफोडी करून आणावे लागत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला.
शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण#AjitPawar#DevendraFadnavis#MaharashtraPoliticspic.twitter.com/616y7jVRol
— Lokmat (@lokmat) July 2, 2023
राज्यातील रविवारच्या राजकीय भूकंपावर चव्हाण म्हणाले, सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून सरकार वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १६ आमदार अपात्र ठरतील का, या विषयावर काही सांगता येत नाही. माझे थोड्या वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. त्यांना मी सांगितले, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत यापुढेही एकत्र राहतील, एकत्र निवडणुका लढवतील.
राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. त्यांच्याशी अजून बोलणे झाले नसून त्यांना थोडा वेळ लागेल, असेही चव्हाण म्हणाले. तसेच नांदेड जिल्ह्यात लाेकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून विधानसभानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असेही चव्हाण म्हणाले.