शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खड्ड्यांमुळे मायलेकाची ताटातूट; अपघातात मुलाच्या डोळ्यांसमोर आईने प्राण सोडले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 1:30 PM

हिंगोली - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्याने घेतला बळी

पार्डी (जि. नांदेड) : नांदेड ते वारंगा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात कोसळून दुचाकीवरील एका महिलेच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. आईचा जीव जाताना मुलगा तिच्या जवळ होता (The mother died in front of the child ). आईला वाचविण्यात तो हतबल झाला होता.

वाळकी बु. ता. किनवट येथील जनाबाई मारोती खोकले (वय ५३) व कोंडीबा मारोती खोकले (वय २८) हे दोघे मायलेक (एमएच २६ - एडब्ल्यू ३९२३) दुचाकीवरून काही कामानिमित्त कळमनुरी येथील पाहुण्यांकडे गेले होते. २४ रोजी सकाळी कळमनुरी ते भोकरमार्गे वाळकीला जाण्यासाठी म्हणून ते दोघे निघाले. पार्डी म. गावाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेल्या जनाबाई उसळून खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांनी त्यांच्या मुलासमोरच जीव सोडला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शेळके, श्रीवास्तव व वसंत शिनगारे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेला व जखमी मुलाला अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केले.

रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती करानांदेड-वारंगा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात दररोज एक-दोन अपघात होताना दिसत आहे. ह्या खड्ड्याची दिवसेंदिवस लांबी-रुंदी वाढत चालली आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे प्रमाण पाहता संबंधिताने चालू रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती करावी आणि रस्त्याचेही काम करावे, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू