नांदेड : नांदेड जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याने सात महिन्यांपूर्वी दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र पाठविले होते. याबाबत विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, असा गौफ्यस्फोट खा.प्रताप चिखलीकर यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कुख्यात असलेल्या रिंदाची नांदेडात आजही दहशत कायम आहे. खंडणीसाठी त्याने डॉक्टर, उद्योजक, व्यापारी यांच्यावर गोळीबारही केला आहे. परंतु सध्या रिंदाची सर्व टोळी तुरुंगात आहे. परंतु रिंदा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यात ५ एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पाेलिस दलाबद्दल जनतेच्या मनात रोष आहे.
बुधवारी पोलिसांच्या विरोधात आंदोलनानंतर चिखलीकरांनी आपल्यालाही खंडणीसाठी पत्र पाठविल्याची धक्कादायक बाब उघड केली. २०२१ मध्ये साधारणता सात महिन्यापूर्वी मला धमकीचे पत्र आले होते. चिखलीकर म्हणाले, याबाबत मी विशेष पोलिस महानिरिक्षक, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. मला या विषयात राजकारण करावयाचे नाही. परंतु मला बंदोबस्त न देण्यासाठी राजकीय दबाव असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. तसेच मला नांदेडात बंदोबस्त देणार पण पुणे, औरंगाबाद, दिल्ली येथे कुठे बंदोबस्त राहणार असे मुद्देही या पत्रात आहेत. दहा कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास मला अन् माझ्या परिवाराला खतम करणार अशा धमकीचे पत्र असल्याचे चिखलीकर म्हणाले. चिखलीकरांच्या या आरोपामुळे मात्र खळबळ उडाली आहे.
तो सब का रामनाम सत्यमोडक्या-तोडक्या हिंदी भाषेतील या पत्रात, मेरे बंदो जितना सतायेगा उतनेही मेरे बंदे गिन-गिन कर मारेंगे. मेरा बंदा आयेगा. आठ दिन मे दस करोड रुपये दे दे.पहले तु औरंगाबाद मे बच गया. तेरे जैसे बहोत जनो को उपर भेज दिया है.दिल्ली मे कितनी सिक्युरिटी रहती है तेरेको ये मालूम है. तुझे मौत या जिंदगी दोनो मे से क्या होना. सब का रामनाम सत्य होगा, अशा प्रकारचा मजकूर आहे. शेवटी तेरी जान लेने वाला यमदूत रिंदा असे नाव आहे.
रेकॉर्ड पाहून सविस्तर बोलेलयाबाबत पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले मी सध्या रुग्णालयात आहे. याबाबत नेमकी काय कार्यवाही करण्यात आली. हे सर्व रेकॉर्ड पाहून सविस्तर माहिती देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.