शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नांदेडचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत; परिसरातील डुकरांच्या हल्ल्यात रुग्णाचा मृत्यू

By शिवराज बिचेवार | Published: November 11, 2023 2:53 PM

डुकरेच उठली जिवावर; या घटनेने रुग्णालय परिसरातील डुकरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

नांदेड - २४ तासात २४ रुग्णांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडालेल्या विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात जेवण करून झाडाखाली विश्रांती घेत असलेल्या एका रुग्णाचे डुकराच्या कळपाने लचके तोडले. त्यातच या रुग्णाचा मृत्यू झाला. कमरेच्या खालचा भाग, दोन्ही गाल आणि नाकाचा भाग या डुकरांनी फस्त केला होता. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतरही पुन्हा तो रुग्णालयात जेवण करण्यासाठी आला होता. या घटनेने रुग्णालय परिसरातील डुकरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे (३५) याला गेल्या अनेक वर्षांपासून टीबीचा आजार होता. त्याच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार घेवून तो बराही झाला होता. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर त्याचे वडील नागोराव कसबे हे त्याला धनगरवाडी येथील आपल्या गावी घेवून गेले होते. १० नोव्हेंबर रोजी तुकाराम हा परभणी येथील काकाकडे जाण्यासाठी निघाला होता. त्याला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वडिलांनी नांदेड रेल्वे स्टेशनवर सोडले होते. परंतु तो परभणीला न जाता परत विष्णुपुरी येथील रुग्णालयात गेला होता. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेले जेवणही त्याने केले. त्यानंतर परिसरातील चिंचेच्या झाडाखाली झोपला होता. त्यातच रात्रीच्या वेळी डुकरांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात तुकाराम यांच्या दोन्ही गालाचे, नाकाचे आणि कमरेखालच्या भागाचे लचके तोडण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही गंभीर बाब उघडकीस आली. त्यानंतर नागोराव कसबे यांनी रुग्णालयात धाव घेतली. नांदेड ग्रामीण पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

डुकरेच उठली जिवावरशासकीय रुग्णालय परिसरात शेकडोंच्या संख्येने डुकरांची संख्या आहे. अनेकवेळा ही डुकरे रुग्णालयाच्या कक्षातही घुसतात. बाहेर थांबलेल्या नातेवाईकांवरही हल्ले करतात. रुग्णालयातील जैवकचरा हेच यांचे प्रमुख अन्न बनले आहे. त्यातून ते आणखी आक्रमक झाल्याचे यापूर्वीही दिसून आले होते. रुग्णालय प्रशासनाने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNandedनांदेडDeathमृत्यू