शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

धक्कादायक! नांदेडमध्ये ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावे पीएम किसानचे अनुदान

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: October 05, 2023 5:25 PM

पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी आणि आधार सीडिंग करणे अनिवार्य आहे.

नांदेड : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेमध्ये जिल्ह्यातील तब्बल ८९०० मयत शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात ५१ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने पीएम किसान योजनेतील हा गोंधळ पुढे आला आहे. एकीकडे पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी अल्पभूधारक, कास्तकारांची धडपड सुरू असताना दुसरीकडे मयत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ५ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होत असल्याचे समोर आले आहे.

पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी आणि आधार सीडिंग करणे अनिवार्य आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक जिल्ह्यात ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसानच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. २७ जुलै २०२३ रोजी ८५ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये हस्तांतरित केले. या योजनेत १८ हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. पण लाखो शेतकऱ्यांना ई-केवायसी नसल्याने हप्ता मिळाला नाही. लाभ मिळावा, यासाठी शासनाने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिलेली आहे.

तालुकानिहाय मयत शेतकरी संख्याजिल्ह्यात पीएम किसान योजनेच्या यादीतील तालुकानिहाय मयत शेतकरी- उमरी ३२६, नांदेड ५१६, माहूर ४८१, अर्धापूर ३१७, देगलूर १०४६, हदगाव ७१४, कंधार ९६८, बिलोली ३९१, किनवट १४५३, भोकर ३५९, धर्माबाद २९०, नायगाव ५३३, मुखेड ४४२, लोहा ३०१, हिमायतनगर ३८१, मुदखेड ३८८ याप्रमाणे ८९०६ मृत शेतकऱ्यांची संख्या आहे.

तत्काळ ई-केवायसी करावीमयत लाभार्थ्यांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळण्यासाठी पोर्टलवर अपलोड करून अपात्र लाभार्थी वगळण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्या लाभार्थ्याने ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी, जेणेकरून पंधरावा हप्ता लवकरात लवकर मिळेल.- विजय बेतीवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र