शेतातून दहा हजारांचे साहित्य लंपास
किनवट तालुक्यातील मौजे रिठा तांडा येथे चोरट्याने आखाड्यावरील सहा बॉक्स फरशी आणि एक पाण्याची मोटार असे दहा हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. या प्रकरणात यादव लिंबाजी जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.
मिलन डे जुगारावर धाड
वाजेगाव परिसरात बिर्याणी हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या मिलन डे नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी तीन हजार रुपये जप्त करण्यात आले असून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
रेल्वे परिसरात अवैध दारूची विक्री
शहरात दत्तनगर भागात असलेल्या रेल्वे पटरीजवळ अवैध विक्रीसाठी ठेवण्यात आलेली दारू पोलिसांनी पकडली. तीन हजार रुपयांची शिंदी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दोन हजारांची हातभट्टी पकडली
मुदखेड परिसरात पोलिसांनी दोन हजार रुपयांची हातभट्टीची दारू पकडली. २४ जून राेजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अविनाश पांचाळ यांनी ठाण्यात तक्रार दिली.
काळेश्वर येथून दुचाकी लंपास
विष्णूपुरी भागातील काळेश्वर येथून गोविंद दत्तराम हंबर्डे यांची एम.एच.२६, एडब्ल्यू १५१९ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
प्रवास करताना मोबाईल लांबविला
हिमायतनगर येथील नूर महमंद सरवर हे२३ जून रोजी नांदेडला आले होते. कलामंदिर ते वजिराबाद चौकदरम्यान ते ऑटोतून प्रवास करीत असताना त्यांच्या खिशातील ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविण्यात आला. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी नोंद केली.